संशोधन; होय, मोजता येऊ शकतो मृत्युचाही वेग

death
नवी दिल्ली – आजवर आपण गाडीचा, वाऱ्याचा, पाण्याचा आणि वेग मोजता येतो असे ऐकले असेलच पण आज आम्ही तुम्हाला एका अशा गोष्टीचा वेग मोजला जाऊ शकतो याची बातमी देणार आहोत. एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या मृत्यूचा वेग कधी मोजला आहे का? नाही ना…! पण अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील २ शास्त्रज्ञांनी मृत्यूचा ही वेग मोजला जाऊ शकतो, असा दावा केला आहे. कोणलाही मृत्युचाही वेग मोजता येऊ शकतो, ही संकल्पना सहजासहजी पचनी पडण्यासारखी नाही. पण ही संकल्पना स्टॅनफोर्ड विद्यापीठातील या शास्त्रज्ञांच्या अभ्यासाने सहज साधली आहे.

या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार एखाद्या व्यक्तीचे जेव्हा निधन होते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरातील सर्व पेशी एकाच वेळी मरण पावत नाहीत. काही कालावधी शरीरातील सर्व पेशी मरण्यासाठी जावा लागतो. पण हा कालावधी किती? याचे उत्तर या दोन्ही शास्त्रज्ञांनी मोजला असून हा वेग मरणाचा वेग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार एखाद्या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्यानंतर मृत्यू त्या व्यक्तीचा शरीरामध्ये दर मिनिटाला ३० मायक्रोमीटर म्हणजेच दोन मिलीमीटर (०.२ सेंटीमीटर) दर तास या वेगाने पसरतो. म्हणजेच शरीरातील पेशी लगेच न मरता त्या एकएक करुन मरण पावतात.

याचाच अर्थ शरीरामधील एक सेंटिमीटर अंतरातील पेशी मृत होण्यासाठी जवळपास ५ तास लागतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्युदेखील झाला तरी त्याच्या मेंदूचा मृत्यू झालेला असतो. परंतू, शरीरातील पेशी लगेच मृत्यू होत नाही. या पेशींचा मृत्यू होण्याच्या वेगालाच मृत्यूचा वेग म्हणून ओळखला जातो.

Leave a Comment