फीचर फोन बाजारात अव्वल स्थानी रिलायन्स जिओ

jio
नवी दिल्ली – देशातील एकूण फीचर बाजारात अव्वल स्थानावर दूरसंचार क्षेत्रातील सेवा देणारी रिलायन्स समुहाची जिओ फोन कंपनी पोहचली असून नुकताच आंतरराष्ट्रीय डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) या संस्थेच्या ‘क्वार्टरली मोबाईल फोन ट्रॅकर’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून त्यानुसार २०१८च्या दुसऱ्या तिमाहीत फीचर फोन बाजारात वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण ४.४ कोटी फीचर फोन्सची या कालावधीत विक्री झाली असून या कालावधीत मागील वर्षी झालेल्या विक्रीच्या तुलनेत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आयडीसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ४जी फीचर फोनची विक्री या तिमाहीत मागील तिमाहीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाली असून या तिमाहीत एकूण १.९ कोटी ४ जी फोन विकले गेले. दरम्यान, आपल्या फीचर फोन्सच्या विक्रीत वाढ होण्यासाठी रिलायन्स जिओने मान्सून हंगामा ऑफर लाँच केली आहे. जिओ याद्वारे एक्सचेंज ऑफरसोबतच व्हॉट्सअॅप व यूट्यूबसारखे अॅपही जिओ फोनवर देणार आहे. २जी फीचर फोनच्या विक्रीत जिओच्या या झंझावातामुळे कमालीची घट झाली आहे. कमीतकमी किमतीत ४ जी फीचर फोन विकण्यावर रिलायन्स जिओद्वारे भर दिला जात आहे.

Leave a Comment