चिनी माध्यमांचा ‘छपाई’चा दावा आरबीआयने फेटाळला

currency
नवी दिल्ली – चीनच्या ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्राने अनेक देशांचे चलन चीनमध्ये छापले जाते, असा दावा केला असून भारतीय चलनाचाही यात समावेश असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे. पण आरबीआयने हे वृत्त खोटे असल्याचे म्हणत, भारतीय चलन भारतातच छापले जाते, असे म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना ‘चायना बँकनोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनचे (सीबीपीएमबी)’ अध्यक्ष लियू गुइशेंग यांनी चीन सरकारने अनेक देशांचे चलन छापण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतल्याचे म्हटले आहे. यावृत्तानुसार, २०१३ मध्ये सुरू झालेल्या ‘बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट’नंतर चीनने परदेशी करंसी छापण्यास सुरुवात केली आहे. सध्या चीनमध्ये असलेल्या सर्वच प्लांटमध्ये चलनी नोटांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे.

या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नेपाळची नोट चीनमध्ये सर्वात पहिली छापण्यात आली. या शिवाय येथे भारत, बांगलादेश, मलेशिया, थायलंडसह इतरही काही देशांच्या नोटा छापल्या जात आहेत. पण भारत वा चीन सरकारने यासंदर्भात अद्याप, कसल्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

Leave a Comment