जाणून घ्या सोनाक्षी सिन्हाची डायट आणि फिटनेस सिक्रेट्स

sonakashi
बॉलीवूडमध्ये ‘दबंग’ या सुपरहिट चित्रपटाच्या द्वारे प्रवेश करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने वजन घटवून ती अगदी सडपातळ दिसू लागल्यामुळे तिने वजन घटविण्यासाठी नेमके काय केले असावे, याबद्दल सर्वांनाच कुतुहल आहे. त्यातून सोनाक्षी आपल्या फिटनेस रुटीनची छायाचित्रे सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांच्या सोबत नियमित शेअर करीत असते. त्यावरून सोनाक्षी आहारासोबत व्यायामाच्या बाबतीतही जागरूक असल्याचे दिसून आले आहे. तिच्या या नव्या आणि फिट रुपामागे कोणती फिटनेस आणि डायट सिक्रेट्स आहेत, हे जाणून घेऊ या.
sonakashi1
सोनाक्षीचा ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होत आहे. त्यानिमिताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सोनाक्षीने आपल्या फिटनेस आणि डायट रुटीन बद्दल माहिती दिली. मागील सहा महिन्यांपासून सोनाक्षीने आपल्या आहारामध्ये अनेक लहान मोठे बदल केले असल्याचे सांगितले. तसेच फिगर मेंटेन करण्यासाठी तिने भरपूर मेहनत केली असल्याचेही ती म्हणाली. फिटनेस साठी सोनाक्षी कार्डियो आणि पिलाटीज या व्यायाम प्रकारांना प्राधान्य देते.
sonakashi2
फिटनेस सोबत सोनाक्षीने आपल्या आहारामध्ये ही अनेक बदल केले आहेत. कितीही आणि काहीही खाल्ले तरी वर्कआउट केल्यानंतर सर्व कॅलरीज खर्च होतात, हा गैरसमज असल्याचे सांगून फिट राहण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारामध्येही शिस्तबद्धता असण्याची आवश्यकता असल्याचे सोनाक्षी म्हणते. ही शिस्तबद्धता अवलंबिल्यानेच आपण इतके फिट दिसत असल्याचे सोनाक्षी म्हणते. सोनाक्षीने प्रोसेस्ड अन्नपदार्थ आपल्या आहारातून वर्ज्य केले असून, ती केवळ घरामध्ये तयार केलेले साधे जेवण घेणे पसंत करते. बाहेर जेवायला जाणे जरी तिला आवडत असले, तरी त्यावरही सोनाक्षीचे नियंत्रण आहे.
sonakashi3
व्यायाम हा संपूर्ण शरीराला फायदा देणारा असावा असे सोनाक्षी म्हणते. शरीराच्या केवळ एकाच भागावर व्यायाम केंद्रित न ठेवता शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम मिळेल याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सोनाक्षी म्हणते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही