नवीन अनाथाश्रमाच्या खोदकामात सापडले ५००० विचित्र जीवांचे सांगाडे !

Orphanage
लंडन – काही दशकांपूर्वी इंग्लंडमध्ये एक अनाथाश्रम होते. काही वर्षांपूर्वीच या इमारतीचे खोदकाम झाले, तळघरात विचित्र जीवांचे सांगाडे तेव्हा सापडले. हे जीव इतके विचित्र होते, की पाहून सगळेच घाबरले. त्यांना अनेकांनी भूत आणि पिशाचांचे अवशेष असे म्हटले. येथे अशाच प्रकारचे एकूण ५००० सांगाडे पाहायला मिळतील. यानंतर नवीन बिल्डिंगच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले. या रहस्यमयी बेसमेंटचा शोध त्याचवेळी लागला होता. यातील अनेक जीवांची आकृती मानवी असली तरीही त्यांच्या डोक्यावर शिंगा आणि पाठीवर पंख होते. त्यापैकी काहींना तर भिंतीवर खिळ्यांनी ठोकून कैद करण्यात आले होते. हे जीव खरेखुरे होते का आणि त्यांचे रहस्य काय याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.
Orphanage1
२००६ मध्ये थॉमस मॅरिलिन हा या विचित्र जीवांच्या खजिन्याचा मालक होता असे सांगितले जाते. तो एक क्रिप्टो नॅचरलिस्ट होता. तो एक असा पुरातत्ववेदता होता जो फक्त अस्तित्वात नसलेल्या आणि निसर्गविरोधी जीवांचा शोध घेऊन ते संग्रहित करायचा. आयुष्यभर त्याने अशाच गोष्टी जगभरातून जमा केल्या आणि ते सर्व अवशेष याच तळघरात आणून लपविल्या होत्या.
Orphanage2
या तळघरात ज्या जीवांचे अवशेष सापडले त्यांना विज्ञान मान्य करत नाही. तरीही लोकांना ते सैतान आणि दुसऱ्या जगातील जीव वाटतात. अनेक दंतकथा थॉमसच्या बाबतीत असून त्यापैकी एक म्हणजे, १७६२ मध्ये त्याचा जन्म झाला होता आणि एवढी वर्षे तो कसा जगला यावर सुद्धा काही दंतकथा आहेत. तो काळी जादू करायचा त्यामुळेच तो एवढी वर्षे जिवंत होता. तर काही लोकांच्या मते, त्याचे वय ८० वर्षे होते. तरीही तो ४० वर्षांचा दिसत होता.
Orphanage3
ज्या ठिकाणी अनाथाश्रम चालत होते ते आधी थॉमस मॅरिलिन नावाच्या व्यक्तीचे घर होते. १९४२ मध्ये त्याने ही जागा अनाथाश्रमाला दान केली होती. थॉमसने त्यावेळी एक अट ठेवली होती. त्यानुसार, ही इमारत कधीच पाडली जाणार नाही. तसेच इमारतीच्या बेसमेंटचे दार कधीही उघडले जाणार नाही. त्याचा २००६मध्ये मृत्यू झाला. तेव्हा त्या इमारतीला पाडून त्या ठिकाणी दुसरी इमारत बांधण्याचे काम सुरू झाले. यासाठी खोदकाम करण्यात आले. तेव्हाच तळघर उघडले आणि ५००० सांगाडे सापडले. या सर्वच जीवांचा आकार, चेहरा आणि देह असे आहेत जे फक्त भयकथा आणि नॉव्हेल्समध्ये ऐकण्यात आले आहे.
Orphanage4
आपल्या वडिलांसोबत मॅरिलिनने जगभ्रमंती केली होती. विचित्र दिसणाऱ्या प्राण्यांचे त्याचे वडील सुद्धा अध्ययन करत होते. ज्या गोष्टींना जग मानत नाही त्याचा ते अभ्यास करत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर एकटा पडलेल्या थॉमसने नंतर हे काम स्वतः सुरू केले. त्याने आयुष्यभर हे सांगाडे जगभरातून गोळा केले. या सांगाड्यांना लोक सैतान, भूत आणि पिशाचांचे अवशेष असे म्हणतात.

Leave a Comment