‘स्कॉलर आजीबाईं’चे आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक

anand-mahidra
सध्या सोशल मीडियावर केरळमधील ९६ वर्षीय आजीबाई बऱ्याच चर्चेत आल्या असून या आजीबाई आपल्या आदर्शस्थानी असल्याचे ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करत म्हटले आहे.


‘फ्लाइंग कलर्स’च्या सहाय्याने साक्षरतेमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या केरळमध्ये राबवण्यात आलेल्या ‘मिशन अक्षरलक्षम’ उपक्रमाअंतर्गत वयाच्या ९६ व्या वर्षी या आजींनी इयत्ता चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जिल्ह्यातून सध्याच्या घडीला चौथीसाठीची इक्विव्हॅलेन्सी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या सर्वात वयोवृद्ध विद्यार्थी ठरल्या आहेत.

या आजीबाईंचे फोटो सोशल मीडियावर अनेकांनीच शेअर केले असून त्यांचे तोंड भरुन कौतुक केले आहे. यातच आपल्या ट्विटमध्ये एका ट्विटर युजरने आनंद महिंद्रा यांचा उल्लेख करत याविषयीची माहिती त्यांनाही दिली. या आजीबाईंविषयी कळताच खुद्द महिंद्रा यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. ही गोष्ट खरी असेल तर या आजी माझ्याही आदर्शस्थानी असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

कार्थ्यायनी अम्मा असे या आजींचे नाव असून, अलाप्पूझा या गावच्या त्या रहिवाशी आहेत. त्यांनी नुकतीच प्राथमिक शालान्त परीक्षा दिली असून त्यांनी त्यात चांगले गुण मिळवले आहेत. या आजींनी यंदाच्याच वर्षी जानेवारी महिन्यात शाळेत प्रवेश घेतला होता.

Leave a Comment