‘ही’ बिअर पिताना जरा जपूनच; जाणून घ्या कशापासून बनते

beer
पोलंड – सुंदर मॉडेल्सच्या प्रायव्हेट पार्ट्सपासून पोलंडच्या एका कंपनीने बिअर तयार केली असून ती बिअर ते लवकरच मार्केटमध्ये आणण्याची तयारी करत आहेत. बिअर तयार करण्यासाठी व्हजाइनाच्या इसेन्सचा वापर या कंपनीने केला आहे. ‘द ऑर्डर ऑफ योनि’ असे बिअर बनवणाऱ्या कंपनीचे नाव असून योनि हा एक संस्कृत शब्द आहे. कंपनीच्या मते, आपल्या मनपसंत मॉडेल्सच्या बॉडी पार्टपासून बनलेल्या या (विचित्र) बिअरचा आस्वाद ग्राहकांना घेता येईल. मॉडेलचे नाव आणि इतर माहिती बॉटलवर असेल. मॉडेल्सच्या शरीरात निर्मिती होणाऱ्या लॅक्टिक अॅसिडपासून ही बिअर तयार केली जात आहे.
beer1
या बिअरबाबतची सविस्तर माहिती कंपनीची वेबसाइट orderyoni.com वर देण्यात आली आहे. ग्राहकांना अनोखा अनुभव देण्याचा दावा करत लिहिण्यात आले आहे की, तुम्ही ही बिअर पितानाच तुमच्या मनपसंत मॉडेलची अनुभूती घेऊ शकाल. तुम्हाला याचा प्रत्येक घोट वेगळाच अनुभव देईल. अशा प्रकारची बिअर तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही, असा दावा कंपनीने आपल्या वेबसाइटवर केला आहे.
beer2
पुढे लिहिण्यात आले आहे की, मॉडेलच्या सौंदर्याचा अर्क या बिअरमध्ये असून ही बिअर बनवण्यात खूप मेहनत लागते. माक्रोबायोलॉजी तंत्रज्ञानाने ही बिअर तयार केली जाते. लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया व्हजाइनापासून तयार करतात. लॅक्टोबेसिलस (lactobacillus) नावाचे हे बॅक्टीरिया शुगरला अॅसिडमध्ये कन्व्हर्ट करतात. या बॅक्टेरियाला मग पुन्हा बिअर तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये वापरले जाते.
beer3
याबाबत धक्कादायक खुलासा करत कंपनीचे मालक वोजटेक मन यांनी सांगितले की, आम्ही ही बिअर बनवण्यासाठी एका स्त्रीरोग तज्ज्ञाची (gynaecologist) मदत घेत आहोत. मॉडल्सच्या बॉडी पार्टमधून ते बॅक्टेरिया घेतात आणि त्यावर काम करतात. या बिअरसोबतच गॅरंटीही दिली जाते की, या एक्स्पेरिमेंटमध्ये सहभागी मॉडेल्स पूर्णपणे स्वस्थ आहेत. या एक्स्पेरिमेंटमध्ये पोलंडच्या मॉडेल पॉलिना आणि मोनिका सहभागी झाल्या आहेत.
beer4
२८ जुलैला ही बिअर लाँच करण्यात आली असून हिचा सर्वात आधी आस्वाद घेणाऱ्या ग्रजेगॉर्ज मजुस्की या ग्राहकाने सांगितले की, ६०० रुपये किमतीची ही बिअर चवीला सर्वसाधारण बिअरसारखीच आहे. यात काहीही अनोखे नाही. उत्सुकतेमुळे लोक जरूर ट्राय करतील, परंतु नेहमीच्या बिअरची जागा ही घेऊ शकणार नाही.

Leave a Comment