‘हे’ अख्खे गाव करते सापांची शेती; आणि झाले आहेत कोट्यधीश

nake
झेजियांग – चीनच्या झेजियांग प्रांतात जिसिकियाओ हे एक असे गाव आहे, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर सापांची शेती केली जाते. याठिकाणचे बहुतांश लोक हेच काम करतात. जवळपास १००० येथील लोकसंख्या असून सुमारे ३० लाख येथे साप पाळले जातात. खाण्यापासून ते औषधी तयार करणे यासाठी त्यांचा वापर होतो. येथील लोकांच्या उत्पन्नाचे हेच मुख्य साधनही आहे आणि आता त्याने व्यवसायाचे रुप घेतले आहे. अनेकप्रकारचे साप हे लोक घरात पाळतात त्यापैकी अनेक विषारी असतात.
nake1
चीनमधील सापाची मागणी पाहता, येथील जास्तीत जास्त लोक सापांचा व्यवसाय करू लागले आहेत. १०० हून अधिक स्नेक फार्म येथे सुरू झाले आहेत. जेवढे लोक गावात आहेत त्यापेक्षा अनेक हजार पट अधिक साप आहेत. एक हजार लोक आणि ३० लाख साप येथे आहेत. सापांच्या अंड्यांमधून उन्हाळ्यात पिले बाहेर येतात त्यावेळी येथे सगळीकडे सापच भरलेले असतात. यात जगातील अनेक विषारी सापही आहेत. हॉटेलमध्ये मांसासाठी आणि पारंपरिक चिनी औषधे तयार करण्यासाठी या सापांचा वापर होतो. सापापासून बनलेले पदार्थ चीनमधील लोक आवडीने खातात.
nake2
सापांपासून कोट्वधींचा व्यवसाय जिसिकियाओ गावात होतो. ८०च्या दशकापासून या गावात साप पाळण्यास सुरुवात झाली आहे. गावाची कमाई त्यावेळी वर्षाकाठी १ लाख युआन म्हणजेच १० लाख रुपये एवढी असायची. बदलत्या वेळेनुसार हळू हळू या व्यवसायामध्ये वाढ झाली आणि त्याने आता एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचे रुप घेतले आहे. त्याचा गावावर सकारात्मक परिणाम झाला आहे. सध्या हा व्यवसाय ८ कोटी युआन म्हणजेच ८० कोटी रुपये एवढी झाली आहे. ती लवकरच १०० मिलियन युआनवर जाईल असे तज्ज्ञांचे मत आहे.