कर्जाच्या दबावामुळे एसबीआयला ५ हजार कोटींचा फटका

SBI
नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमधील कर्जाच्या दबावामुळे भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय) तब्बल ४,८७६ कोटींचे मोठे नुकसान झाले आहे. याच तिमाहीमध्ये मागील आर्थिक वर्षी एसबीआयला २ हजार ६ कोटींचा फायदा झाला होता.

बँकेची स्थिर संपत्ती (एनपीए) एसबीआयला झालेल्या तोट्यामुळे ९.९७ टक्क्याहून वाढून १०.६९ टक्के झाली आहे. याबाबत बँकेने म्हटले आहे, की एकूण कर्ज ८ हजार ९२९.४८ कोटीच्या दुप्पट चालू आर्थिक वर्षात पहिल्याच तिमाहीमध्ये झाले होते. ते वाढून १९ हजार २२८ कोटी रुपयापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे एसबीआयला नुकसान झाले आहे.

Leave a Comment