…यासाठी मोदींनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार

combo
नवी दिल्ली – शिवसेनेने राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदींनी फोन केला. त्यांनी त्यासाठी ठाकरेंना धन्यवादही दिले. शिवसेनेचे ३ सदस्य राज्यसभेत असून त्यांचे मत निवडणुकीत निवडून येण्यासाठी मिळणे महत्त्वाचे होते. गुरुवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये उपसभापती पदासाठी निवडणूक झाली होती. दरम्यान हरिवंश नारायण सिंह यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे उमेदवारी दिली होती.

मोदींनी फोन केल्यानंतर याचे पडसाद राजकीय पटलावरही पाहायला मिळत आहेत. शिवसेना मागील काही दिवसांपासून भाजपशी नाराज असल्याचे दिसत होते. पंतप्रधानांनी ही दरी भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन केला आहे असे म्हटले जात आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी तर्फे राज्यसभेत झालेल्या निवडणुकीमध्ये बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण १०५ मतांवरच त्यांना समाधान मानावे लागले. निवडून आलेले हरिवंश सिंह यांचे पंतप्रधान मोदींनी सभागृहात जाऊन अभिनंदनही केले होते.