भारतात लॉन्च झाला शाओमीचा Mi A2, प्री-बूकिंगला सुरूवात

Xiaomi
Mi A2 हा स्मार्टफोन मोबाईल उत्पादक कंपनी शाओमीने भारतात लॉन्च केला असून आजपासून तब्बल 20 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या या फोनच्या प्री-बूकिंगलाही सुरूवात झाली आहे. २० आणि १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे या फोनच्या मागच्या बाजूला आहेत. तर २० मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फीप्रेमींसाठी पुढील बाजूस देण्यात आला आहे. अॅमेझॉन आणि शाओमीच्या संकेतस्थळांवरुन आज दुपारी १२ वाजल्यापासून याची प्री-बूकिंग सुरु झाली आहे. त्यानंतर फोनच्या शिपींगला १२ ऑगस्टपासून सुरूवात होईल आणि ग्राहकांच्या हातात १६ ऑगस्टच्या आधी पहिला Mi A2 फोन असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

शाओमी कंपनीने गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या आपल्या ग्रँड इव्हेंटमध्ये Mi A2 आणि Mi A2 Lite हे दोन स्मार्टफोन सादर केले होते. मागच्या काही दिवसांपासून या दोन्ही फोनबाबत बरीच चर्चा होती. आज अखेर Mi A2 हा स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लॉन्च झाला आहे. ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. याशिवाय या फोनमध्ये ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज असलेले व्हेरिअंटही असेल असे सांगण्यात येत आहे, मात्र या व्हेरिअंटची किंमत किती असणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment