हा आहे झारखंडमधील ‘लखपती भिकारी’

beggat
रस्त्याच्या कडेला, ट्रॅफिक सिग्नल्सच्या जवळ, धार्मिक स्थळांच्या आसपास भिकाऱ्यांची गर्दी पाहायला मिळणे हे नित्याचेच झाले आहे. या मंडळींच्या पेहरावावरुन हे लोक अतिशय निर्धन आहेत अशी समजूत झाल्याने त्यांना आर्थिक मदत करणारे देखील भरपूर लोक पाहायला मिळतात. मात्र आपल्या डोळ्यांना जे दिसते ते खरे असतेच असे नाही. झारखंड मध्ये राहणारा ‘लखपती भिकारी’ याचे उदाहरण म्हणता येईल.

या व्यक्तीकडे पाहून या व्यक्तीची कमाई लाखोंच्या घरामध्ये असेल, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. हा लखपती भिकारी सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत भीक मागण्याचे काम करतो खरा, पण या कामाबरोबर याचे इतरही व्यवसायही आहेत. या भिकाऱ्याला तीन पत्नी असून, या तिघी जणी त्याचा व्यवसाय सांभाळतात. छोटू बारीक नामक हा भिकारी झारखंड मधील चक्रधरपूर गावाच्या रेल्वे स्थानकावर भीक मागण्याचे काम करतो. पण या भिकाऱ्याची एकूण कमाई आणि त्याचे भीक मागण्या व्यतिरिक्त इतर, उत्तम स्थितीमध्ये चालणारे व्यवहार पाहून स्थानिक लोक त्याला ‘लखपती भिकारी’ या नावाने ओळखू लागले आहेत.

छोटू बारीक याचे स्वतःचे भांड्यांचे दुकान असून, त्याच्या तीन बायका हे दुकान सांभाळतात. छोटू बारीक हा एका मार्केटिंग चेन कंपनीचाही सभासद असून, कंपनीच्या सर्व बैठकांना छोटू अगदी सूट-बूट घालून हजेरी लावीत असतो. छोटू पायाने अधू असला, तरी त्याचे अपंगत्व त्याच्या कमाईच्या आड आलेले नाही. वर्षाला साधारण साडेतीन ते चार लाख रुपये इतकी कमाई करणारा हा लखपती भिकारी आपल्या तिघी पत्नींच्या सहाय्याने आपले घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळतो.

Leave a Comment