स्विफ्टच्या टॉप व्हेरिएंट्समध्ये मिळणार ऑटो गियर शिफ्ट फीचर

swift
नवी दिल्ली – आपल्या हॅचबॅक श्रेणीतील स्विफ्ट कारच्या टॉप व्हेरिएंट्ससाठी ऑटो गियर शिफ्ट (एजीएस) हे आधुनिक फीचर ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने लॉन्च केले आहे. हे फीचर स्विफ्ट कारच्या झेडएक्सआय प्लस आणि झेडडीआय प्लस या मॉडेलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. झेडएक्सआय प्लस या पेट्रोल कारची आणि झेडडीआय प्लस या डीझेल कारची शोरूम किंमत अनुक्रमे ७.७६ लाख रूपये आणि ८.७६ लाख रूपये एवढी आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी निर्देशक आर. एस. कलसी यांनी सांगितले, की एजीएससंबंधी आमच्या स्वीफ्टच्या ग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सर्वांत जास्त प्रमाणात विकल्या जाणाऱ्या टॉप कारमध्ये एजीएस प्रणाली ही सुविधा देण्याची मागणी ग्राहकांनी आपल्या प्रतिक्रियेत केली आहे.

ते पुढे म्हणाले, की आम्ही झेडएक्सआय प्लस आणि झेडडीआय प्लस या मॉडेलमध्ये ही सुविधा ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळेच दिली आहे. यामुळे स्विफ्ट ब्रँड आणखी लोकप्रिय होण्यास मदत होईल. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या पीढीतील स्विफ्ट कार मारुती सुझुकीने लॉन्च केली होती. २००५मध्ये लॉन्च झालेल्या स्विफ्ट कारचे आतापर्यंत भारतात १९ लाख मॉडेल्स विकले गेले आहेत.

Leave a Comment