टेस्लाच्या सीईओंची संपत्ती एका ट्विटमुळे ९६०० कोटींनी वाढली

tesala
सॅन फ्रान्सिस्को – सध्याच्या सार्वजनिक जीवनाचा सोशल मीडिया हा अविभाज्य भाग बनला असून सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून काही सेलेब्रिटींना आर्थिक कमाई होत असल्याच्या बातम्या आम्ही तुम्हाला सांगितल्याच आहेत. पण टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांची संपत्ती एका ट्विटमुळे तब्बल ९ हजार ६०० कोटी रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी ट्विटर वरून टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली होती. टेस्ला कंपनी वॉल स्ट्रीटमधून बाहेर काढून प्रायव्हेट कंपनी बनवण्याचा विचार आपण करत आहोत. तसेच ४२० डॉलर (28 हजार 800 रुपये) प्रति शेअर दराने कंपनीच्या भागधारकांकडून समभाग परत खरेदी केले जातील, अशी घोषणा करणारे ट्विट मस्क यांनी केले.

टेस्लाच्या शेअर्सचे भाव या ट्विटनंतर मोठ्या प्रमाणात वधारले. तसेच ११ टक्क्यांनी शेअरची किंमत वाढून ३७९.५७ डॉलर एवढी झाली. मस्क यांच्या संपत्तीमध्येही शेअरची किंमत वधारल्याने ९ हजार ६०० कोटींची वाढ झाली आहे. ४७ वर्षीय मस्क हे टेस्लामधील सर्वात मोठे भागधारक असून, ते जगातील ३१ वे श्रीमंत व्यक्ती आहेत. आपल्या योजनेनुसार आता जर मस्क यांनी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी असलेल्या टेस्ला हिला सार्वजनिक कंपनीमधून प्रायव्हेट कंपनी बनवले तर हा अशा प्रकारचा सर्वात मोठा व्यवहार असेल.

Leave a Comment