…तर तुमचेही खाते होऊ शकते रिकामे – स्टेट बँकेने दिला इशारा


देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक इंडियाच्या नावाने खोटे फोन करून गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करण्यात आल्यानंतर एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी इशारा जारी केला आहे. एसबीआयच्या नावाने काही लोक खोटे संदेश पसरवत आहेत आणि त्यामुळे ग्राहकांचे खाते पूर्णपणे रिकामे होऊ शकते, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे.

बँकेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा संदेश जारी करण्यात आला आहे. बँकेच्या वतीने ग्राहकांना कोणतीही माहिती मागण्यात आलेली नाही. या संदर्भात काही बनावट एसएमएस पसरविण्यात येत आहेत. मात्र बँकेच्या ग्राहकांनी कोणालाही माहिती देऊ नये आणि त्यांनी ती दिलीच तर बँकेला त्वरित कळवावे, असेही बँकेने म्हटले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा रिझर्व्ह बँकेच्या नावाने फसवेगिरी करणाऱ्या एका टोळीला दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली होती. या टोळीने 2000 ग्राहकांना फोन करून 5 कोटी रुपयांचा गंडा घातला होता. या टोळीत 22 टेलिकॉलर महिलांसहित एकूण 30 जण होते. त्यानंतर बँकेने हा इशारा दिला आहे.

Leave a Comment