ना छत्रीची गरज, ना रिचार्जचे टेन्शन


भारतीय बाजारपेठेत सध्याच्या असे अनेक सेट-टॉप बॉक्स आहेत, ज्यासाठी तुम्हाला छत्री लावण्याचीही गरज नाही. म्हणजेच तुम्ही तुमचे मनपसंत चॅनल्स छत्री न लावताही पाहू शकाल. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारेच रिचार्ज करण्याचीही गरज नाही. तुम्ही यावर येणारे चॅनल्स मोफत पाहू शकाल. कॉम्पॅक्ट साइजचा हा सेट-टॉप बॉक्स असून जो तुम्ही तुमच्या पॉकेटमध्येही कॅरी करू शकतात.

या सेट-टॉप बॉक्सची खास बाब म्हणजे हा इंटरनेटच्या मदतीने चालतो. कंपनी यासाठी एक डोंगलही फ्री देते. तथापि, याला इंटरनेट केबल किंवा वायफायच्या मदतीनेही अॅक्सेस केले जाऊ शकते. याबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, इंटरनेटच्या मदतीने या सेट-टॉप बॉक्सवर १००० हून जास्त चॅनल्स पाहिले जाऊ शकतात. तुमच्या घरात जर इंटरनेट नाही, तरीही यावर १३२ चॅनल्स लाइफटाइम फ्री पाहता येतील.

सर्व प्रकारच्या टीव्हीशी या कॉम्पक्ट साइज सेट-टॉप बॉक्सला कनेक्ट केले जाऊ शकते. यासाठी स्मार्ट टीव्ही असणे गरजेचे नाही. सेट-टॉप बॉक्समध्ये अँटिना इन, RC केबल, HDMI केबल तिन्ही ऑप्शन आहेत. बॉक्सला अॅडॉप्टरच्या मदतीने पॉवर दिली जाते. डोंगल लावण्यासाठी याच्या फ्रंटमध्ये USB पोर्ट देण्यात आला आहे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटमधून या सेट-टॉप बॉक्सला खरेदी करता येईल. अॅमेझॉन, स्नॅपडीलसोबतच इतर ई-कॉमर्स वेबसाइटवरूनही हा सहजतेने उपलब्ध आहे. या बॉक्सची ऑनलाइन किंमत 1549 रुपयांपासून सुरू होते.

Leave a Comment