इंद्रा नुयी पेप्सिको सीईओ पदावरून पायउतार होणार


पेप्सिको या शीतपेये आणि फूड सेक्टरमधील जगप्रसिद्ध कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ इंद्रा नुयी त्याच्या पदावरून ३ ऑक्टोबरला पायउतार होत असून त्यांची जागा स्पेन चे रेमोन लागुअती हे घेणार आहेत. लागुअती यांना गेल्या वर्षीचा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली गेली होती. नुयी यांनी १२ वर्षे या सर्वोच्च पदावर काम केले असून त्या अजून काही काळ कंपनीच्या संचालक राहणार आहेत. इंद्रा नुयी यांच्याकडे कॉर्पोरेट सेक्टर मधील महिला सबलीकरणाचे प्रतिक म्हणून पहिले जाते.

आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा करताना नुयी म्हणाल्या, पेप्सिकोचे नेतृत्व करायला मिळाले हा माझ्या आयुष्यातील मोठा सन्मान आहे. गेली १२ वर्षे कंपनी, भागधारक आणि संबंधित याच्या हिताचे रक्षण करण्याचे काम केले याचा मला अभिमान वाटतो.

नुयी याच्या काळात पेप्सिकोच्या धोरणात अनेक नवीन बदल केले गेले आणि कंपनीत झालेल्या नव्या प्रयोगांचे श्रेय त्यांनाच दिले जाते.

Leave a Comment