इंडिया पोस्ट पेमेंट बँक देशाच्या गावागावात पोहोचणार


येत्या २१ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते देशात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या कामाचा शुभारंब होत असून ६४८ शाखा कार्यरत केल्या जाणार आहेत. बँकिंग सुविधांपासून अजून बरेच दूर राहिलेल्या ग्रामीण भागात बँकिंग सेवा देण्याच्या उद्देशाने या बँक सुरु होत असून एकूण ६५० शाखा सुरु केल्या जाणार आहेत. पैकी २ शाखा यापूर्वी रांची आणि रायपुर येथे सुरु झाल्या आहेत.

या बँकेविषयी अधिक माहिती अशी कि, या बँकेत बचत खात्यात १ लाख रुपयापेक्षा अधिक पैसे ठेवता येणार नाहीत. एटीएम, डेबिट कार्ड ग्राहकांना मिळेल पण क्रेडीट कार्ड मिळणार नाही. तसेच या बँक्स कर्ज पुरवठा करणार नाहीत. या बँकेच्या कामासाठी देशातील १ लाख ५५ हजार पोस्ट ऑफिस शाखांचा वापर केला जाईल. देशातील सर्व पोस्ट कार्यालये या वर्षाखेर जोडली जातील. या बँकेत करंट खाते सुरु करता येणार नाही. ग्राहकाला पोस्टमन कडून घरपोच सेवा मिळू शकणार आहे.

या पद्धतीच्या बँका केवळ भारतातच नाही तर जगातील ७५ टक्के देशात चालविल्या जातात. त्यात जपान, न्युझीलंड, फ्रांस, द.कोरिया, आफ्रिका या देशांचा समावेश आहे.

Leave a Comment