गुगलने लॉन्च केले नवीन अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम


नवी दिल्ली – गुगलने अँड्रॉईडचे नवे ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केले असून या नव्या ऑपरेटिंग सिस्टमला अँड्रॉईड पाय (pie) असे नाव देण्यात आले आहे. आजपासून हे सिस्टम उपलब्ध होणार असल्यामुळे या सिस्टमला सपोर्ट करणारे अँड्रॉईड फोन आज अपडेट होतील.

अनेक नव्या फिचर्सचा समावेश अँड्रॉईड पायमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये मशिन लर्निंग अॅल्गोरिदम हे फिचर विशिष्ट आहे. मोबाईलचा ब्राईटनेस या फिचरमुळे आपोआप अॅडजस्ट होतो. सोबतच फोनची बॅटरी सुद्धा अडजस्ट होते. सॉफ्टवेअरमध्ये वापरकर्त्यांच्या सवयीनुसार अॅडजस्टमेंट होऊन त्यानुसार बॅटरी चार्ज करण्याची क्षमता या नवीन सिस्टममध्ये आहे.

वेगवेगळ्या टास्कसाठी या ऑपरेटिंग सिस्टममुळे मोबाईल सज्ज होतो. त्यावरून जर वापरकर्त्यांनी मोबाईलला हेडफोन कनेक्ट करताच मोबाईलमध्ये प्लेलिस्ट ओपन होते. वन प्लस, सोनी, एमआय, ओप्पो आणि विवो कंपनीचे मोबाईल वर्षाच्या अखेरपर्यंत अपडेट होतील.

Leave a Comment