मोटोरोलाने लॉन्‍च केला पहिला ५जी स्मार्टफोन!


मुंबई : आपला आणखी एक नवा स्मार्टफोन जगातील प्रसिद्ध मोबाईल कंपनी मोटोरोलाने लॉन्च केला असून मोटो झेड ३ या नावाने कंपनीने हा फोन लॉन्च केला आहे. मोटो झेड ३ प्‍लेचा कंपनीचा हा फोन अॅडवांस प्रीमियम व्हर्जन आहे. हा फोन स्‍टॉक अँड्रॉईडसह लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये मोटो झेड सीरीजच्या इतर फोन प्रमाणे देखील मोटो मॉड्सचा वापर करता येऊ शकतो. या फोनच्या ५जी मोटो मॉड्ससाठी कंपनीने लेनोवोसोबत करार केला असल्यामुऴे भविष्यात मोटो झेड ३ स्‍मार्टफोन ५जी टेक्‍नोलॉजीला देखील सपोर्ट करेल.

अमेरिकेत या फोनची किंमत ४८० डॉलर म्हणजेच ३३ हजार रुपये आहे. सेरेमिक ब्‍लॅक रंगात कंपनीने हा फोन लॉन्च केला आहे. १६ ऑगस्ट पासून या फोनची विक्री सुरु होणार आहे. भारतात मोटो झेड ३ मॉड्सची किंमत किती असेल याबाबत अजून कोणताही खुलासा कंपनीने केलेला नाही. लवकरच हा फोन भारतात देखील लॉन्च होणार आहे. या वर्षाच्या शेवटी हा फोन भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

Leave a Comment