आंध्रात शेते, मैदानात सुरु आहे हिऱ्यांचा शोध


पावसाला सुरवात होऊन थोडा काळ गेला कि आंध्रातील कर्नुल आणि अनंतपुर जिल्ह्यात रोजगार सोडून लोक शेते, जमिनी धुंडाळायला सुरवात करतात असे दिसून येईल कारण या दिवसात या भागात हिरे शोधण्याचे काम जोरात चालते. या भागाला हिऱ्याची जमीन असेच म्हटले जाते. हा भाग हिरयांसाठी प्रसिद्ध असून येथील जमिनीत खूप मोठ्या प्रमाणावर खनिजे आहेत.

भूगर्भ विभागातील अधिकारी सांगतात, फार पूर्वी कृष्णदेवराय याच्या काळात तसेच ब्रिटीश काळात येथे हिरे मिळविण्यासाठी खोदकाम झाल्याचे पुरावे आहेत. पावसाला सुरवात झाली कि जमिनीचा वरचा थर वाहून जातो आणि अनेकदा पृथ्वीच्या आतील थरात असलेले दगड वर येतात त्यात अनेकदा हिरे असतात.


येथील लोक तसेच आसपासच्या राज्यातले लोकही या काळात येथे हिरे शोधण्यासाठी येतात. त्याच्याकडे कोणतेहि आधुनिक तंत्रज्ञान नाही. सूर्य अथवा चंद्र प्रकासःत जेथे जमिनीवर जास्त चमक दिसेल तेथे हे खडे शोधले जातात. अर्थात असा एखादा मौल्यवान खडा मिळणे हा नशिबाचा भाग असतो तरी आशेने लोक येथे शोध घेत राहतात. एखाद्याला असा खडा मिळाला तर तो दलालांना दिला जातो ते त्यबदली काही पैसे संबंधित माणसाला मजुरी म्हणून देतात असे समजते.