असे होते ओसामा बिन लादेनचे बालपण


ओसामा बिन लादेनचे नाव परिचयाचे नाही असे कोणी विरळाच असेल. संपूर्ण जगभर आपल्या अतिरेकी कारवायांनी धुमाकूळ घालणाऱ्या अतिरेकी संघटनेचा हा म्होरक्या एके काळी जगातील ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगारांपैकी एक होता. जगाला दहशत बसेल असा हल्ला अमेरिकेमध्ये केल्यानंतर ओसामाला पकडण्यासाठी अमेरिकेने आकाश पाताळ एकत्र केले. अखेरीस अमेरिकन नेव्ही सील्सनी अॅबोटाबाद येथील ओसामाच्या घरामध्ये घुसून त्याला यमसदनी धाडला.

जगाला दहशत बसेल अशा ओसामाचे बालपण मात्र सर्वसमान्य मुलांसारखेच होते. त्याच्या आईच्या मते ओसामा लहानपणी काहीसा लाजाळू, पण अतिशय मृदू स्वभावाचा मुलगा होता. ओसामा साठी आपले आप्तस्वकीय अतिशय जवळचे होते. ओसामा एकत्र कुटुंबामध्ये वाढला असून, त्याला सर्व मिळून पन्नास भावंडे होती. असा हा लाजाळू, अबोल मुलगा, पुढे इतक्या दहशतवादी कारवाया करेल याची कल्पना तेव्हा कोणीच करू शकले नसेल.

लादेनचे वडील, मोहम्मद बिन लादेन आधी येमेन मध्ये काम करीत असत. सौदी अरेबियामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी बांधकाम व्यवसायात हात घातला. पाहता पाहता त्यांचा हा व्यवसाय इतका फोफावला, की सौदी अरेबियाच्या शाही खानदानासाठी अनेक राजमहाल तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली.

शाही खानदानाशी त्यांचे संघष्ठन इतके जास्त होते, की जेव्हा शाही खजिना जवळजवळ रिकामा झाला, तेव्हा शाही खानदानाच्या दिमतीला असलेल्या समस्त नोकरदारांचे पगार मोहम्मद देत असत. त्यांचे हे दातृत्व बघून इथून पुढे बांधकामाची सर्व कंत्राटे मोहम्मद यांनाच देण्यात यावीत असे ऐलान शाहने केले. इतकेच काय तर मोहम्मदला पुढे मंत्रिपदही देण्यात आले. वडिलांच्या अफाट संपत्तीच्या जोरावर लहानग्या ओसामाचे आयुष्य अगदी ऐषारामाचे होते. ओसामा तेरा वर्षांचा असताना मोहम्मदचे अपघाती निधन झाले. ओसामाच्या आईने त्यापूर्वीच पुनर्विवाह केला होता. वयाच्या सतराव्या वर्षी ओसामाचा विवाह झाला. लादेन याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण जेद्दाह मध्ये झाले.

१९८१ साली त्याने ‘पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ या विषयात पदवी मिळविली. त्याच काळादरम्यान ओसामाचा संपर्क काही कट्टरपंथीय लोकांशी येऊन त्यानंतर तोही कट्टरपंथी बनला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओसामाने दहशतवादी कृत्ये करण्यात आपली बुद्धी आणि ताकद खर्ची घातली. त्याने अल कायदा नामक दहशतवादी संघटनेची स्थापन करून नैरोबी, केन्या, टांझानिया देशांतील दूतावासांवर आतंकी हल्ले घडवून आणले. त्यानंतर अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटगॉन वरील हल्लेही ओसामाने घडून आणले. या हल्ल्यानंतर तब्बल दहा वर्षे ओसामा त्याला तावडीत पकडण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या सुरक्षा संघटनांना हुलकावणी देत होता. अखेरीस अबोटाबाद येथील त्याच्याच घरामध्ये त्याला ठार मारण्यात अमेरिकन नेव्ही सील्सना यश आले.

Leave a Comment