आपल्या शरीरावर उपवासाचा परिणाम कश्या प्रकाराने होतो?


भारतामध्ये उपवास करण्याची परंपरा शतकानुशतके रूढ आहे. व्रत वैकल्ये, सणासुदीच्या निमित्ताने असलेले उपवास, किंवा आठवड्यातून एकदा नियम म्हणून उपवास, वजन घटविण्यासाठी उपवास अश्या निरनिराळ्या कारणांनी उपवास घरोघर केले जातात. पण मुख्यत्वे धार्मिक व्रत वैकल्यांच्या पूर्ततेसाठी उपवास केले जात असतात. अश्या उपवासांमध्ये काही जण संपूर्ण दिवसभर उपवास करतात, आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडतात, तर काही जण चोवीस तासांचा उपवासही करतात. काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात, तर काही केवळ दुध आणि फलाहार घेऊन उपवास करतात. काही जण उपवासांच्या दरम्यान पाणीही पीत नाहीत. अश्या या निरनिराळ्या उपवासांचा आपल्या शरीरावर नेमका काय आणि कसा परिणाम होतो हे जाणून घेणे अगत्याचे ठरते.

जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकार च्या व्याधी नसतील, आरोग्य एकदम उत्तम असले, तर अश्या व्यक्तींना चोवीस तास उपवास केल्यानन्तरही फारसे नुकसान नाही. मात्र ज्या व्यक्तींना काही व्याधी आहेत, त्यांनी मात्र उपवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय उपवास सुरु असताना अजिबात न खाता, उपवास सुटल्यानंतर भरपूर खाणे, हे ही अपायकारक ठरू शकते. तसेच उपवासाचे पदार्थ देखील हलके, पचण्यास सोपे नसून, भरपूर तेलाने आणि तुपाने युक्त असणे, ही ही अपायकारकच म्हणायला हवे.

आपण खातो ते अन्न आपल्या शरीराचे इंधन असते. जेव्हा आपण काही खातो, तेव्हा आपल्या शरीरातील इंस्युलीनची पातळी वाढते आणि आपल्या अन्नातील ग्लुक्जोचा वापर शरीरातील उर्जेमधे होतो. अतिरिक्त ग्लुकोज ग्लायकोजेनच्या रुपात आपल्या लिव्हरमध्ये साठविले जाते. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा हे संचयित ग्लायकोजेन आपल्या शरीराला उर्जा देण्याचे काम करीत असते. उपवास करीत असताना आपल्या शरीरावर त्याचे परिणाम कश्या प्रकारे होतात, हे जाणून घेऊ या.

आपल्या उपवासापूर्वीच्या भोजनाच्या सहा ते चोवीस तासांनंतर इंस्युलीनची पातळी घटू लागते, आणि लिव्हरमध्ये साठविलेले ग्लायकोजेन अश्या वेळी शरीराला उर्जा देण्याचे काम करते. त्यानंतर आपले लिव्हर, अमिनो अॅसिड्सच्या मदतीने ग्लुकोज बनविणे सुरु करते. जेव्हा शरीरातील संचयित कर्बोदके खर्च होतात, तेव्हा शरीरातील चरबी उर्जा बनविण्याच्या कामी खर्च होऊ लागते. त्यानंतर प्रथीनेही या कामी वापरली जाऊ लागतात. शरीराची शुद्धी करून त्यामध्ये साठलेले सर्व हानिकारक घटक बाहेर पडावेत, तसेच पचनतंत्र सुरळीत चालावे यासाठी उपवास लाभकारी आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment