बॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्रींचे एकमेकींशी नाही पटत !


आजवर आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील गॉसिप आणि काही रोचक माहिती सांगितल्या आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशी बातमी सांगणार आहोत, जी बॉलीवूडमधील एकमेकांशी न पटणाऱ्या अभिनेत्रींच्या बाबत. तर चला मग जाणून घेऊया कोण आहेत त्या…

सनी लिओन आणि राखी सावंत यात पहिली जोडी आहे. या दोघींमधील वाद-विवाद आणि भांडण तर जगजाहिर आहेत. राखीचे महत्त्व, भाव सनीच्या बॉलिवूड पर्दापणामुळे कमी झाल्यामुळे अनेकदा राखी मीडियासमोर सनीबद्दल वाटेल ते बोलताना दिसते. पण राखीच्या या बोलण्याला सनी तिच्या खास शैलीत उत्तर देते.

अभिनेता रणबीर कपूर हा दीपिका आणि कतरिनामध्ये असलेल्या वादाचे कारण ठरला असून कतरिनामुळे रणबीर-दीपिकाचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. कतरिना कदाचित ब्रेकअपला जबाबदार ठरल्यामुळे दीपिका काहीशी नाराज असावी. त्यामुळे या दोघीही एकमेकींपासून दूर राहणेच पसंत करतात.

बॉलिवूडमध्ये रेखा आणि जया बच्चन यांचे सर्वात जूने भांडण आहे. महानायक अमिताभ बच्चन या दोघींमधील वादाला कारणीभूत ठरले. त्यामुळे अजूनही त्या एकमेकींपासून लांब राहणेच पसंत करतात. पण काळानुसार राग थोडा निवळलेला दिसतो. म्हणून आजकाल पुरस्कार सोहळ्यात दोघी एकमेकींना सामोरे जातात.

करिना कपूर खान आणि प्रियंका चोप्रा ही अजून एक हेट जोडी. दोघींनी ऐतराज चित्रपटात एकत्र काम केले. करिना यात प्रमुख भूमिकेत होती तर प्रियंका खलनायिकेच्या भूमिकेत होती. पण या चित्रपटातील प्रियंकाच्या कामाचे खूप कौतुक झाल्यामुळे करीनाच्या मनात काहीसा मत्सर निर्माण झाला आणि दोघींनी पुन्हा एकत्र काम केले नाही.