अंगठा उठवून देता येणार पेट्रोल, डीझेल बिल


पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर रोख, क्रेडीट, डेबिट कार्डने पैसे चुकते करायची गरज आता लवकरच संपुष्टात येणार आहे. देशभरातील पेट्रोल पंपावर बसविल्या जाणार असलेल्या मायक्रो एटीएम ऑक्सिजन मशीन मुळे केवळ अंगठ्याचा ठसा देऊन हे बिल भागविता येणार आहे. इंडिअन ऑइल कार्पोरेशनने यासाठी ऑक्सिजन मायक्रो एजन्सी आणि आयडीएफसी बँकेबरोबर करार केला आहे. अशी मशीन भोपाल येथील दोन पेट्रोल पंपावर बसविली गेली असल्याचे समजते. संपूर्ण देशभरात ती येत्या काही महिन्यात बसविली जाणार आहेत.

डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत हा उपक्रम चालविला जात आहे त्याचबरोबर कॅशलेस व्यवहार वाढीसाठी टाकलेले हे पाउल आहे. हा उपक्रम म्हणजे एक प्रकारचे पीओएस (पॉइंट ऑफ सेल ) मशीन आहे. यात रिटेल नेटवर्क माध्यमातून पैसे ट्रान्स्फर होतात. डेबिट, क्रेडीट, क्यूआर कोड, भीप, आधार पे, युपीआय सेवा यात वापरता येतात. त्यासाठी ग्राहकाला एकदा केवायसी प्रक्रिया पुरी करावी लागेल. त्यानंतर देशात कुठल्याची पेट्रोल पंपावर अंगठा उठवून इंधन घेता येणार आहे.

यात ग्राहकाला स्वतः पेट्रोल भरून घेण्याची सुविधाही मिळेल. त्यामुळे इंधन चोरी टळेल आणि कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य मिळेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment