मोदींच्या लोकसभा मतदारसंघात आहे आकर्षक ‘भारत माता मंदिर’


वारानसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आणि देशातील प्राचीन शहर असलेल्या वाराणसीत एक आकर्षक ‘भारत माता मंदिर’ असून सध्या हे मंदिर चांगलेच चर्चेत आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘अखंड भारताचा’ नकाशा यातील मकराना संगमरवरावर काढण्यात आला आहे. अनेकदा श्रद्धाळुंच्या नजरेतून जगभरातील श्रद्धाळूंना आकर्षित करणाऱ्या या शहरात असलेले हे मंदिर चुकते. पण येथे विदेशी पर्यटक अगत्याने येतात.

हे मंदिर काशी विद्यापीठ परिसरात असून, १९१८ ते १९२४ या काळात शिव प्रसाद गुप्ता यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. महात्मा गांधींनी २५ ऑक्टोबर, १९३६ साली या मंदिराचे उद्घाटन केले होते. या मंदिरात असलेल्या मकराना संगमरवरावर अखंड भारताचा नकाशात तयार करण्यात आला आहे. अफगानिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश आणि म्यामार यात भारताचे भाग दाखवण्यात आले आहेत.

Leave a Comment