शाओमी मी एमआयएक्स ३ चे डिझाईन लिक


चीनी स्मार्टफोन कंपनीने त्यांचा नवा मी एमआयएक्स ३ स्मार्टफोन बाजारात आणण्यापूर्वीच या फोनचे डिझाईन लिक झाले आहे. या फोनच्या किमती आणि काही फीचर्स लिक झाली असून त्यानुसार हा फोन दोन व्हेरीयंट मध्ये सादर केला जात आहे. हा फोन विवो एनइएक्स व ओप्पो फाईंड एक्स बरोबर स्पर्धा करेल.

या फोनचे स्टँडर्ड आणि सिरामिक एडिशन बाजारात उतरविल्या जातील. ६ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी आणि ८ जीबी रॅम ,१२८ जीबी मेमोरी त्याला दिली जाईल, पैकी स्टँडर्ड फोनसाठी ५१० डॉलर्स म्हणजे ३५१०० रु. मोजावे लागतील तर सिरामिक एडिशन साठी ६६० डॉलर्स म्हणजे ४५४०० रु. द्यावे लागणार आहेत. ६ जीबी रॅम मॉडेलसाठी ३८२०० तर ८ जीबी रॅम साठी ४१३०० ते ५१६०० रु. किंमत असेल.

कंपनीच्या हा फ्लॅग शिप फोन आहे. त्यासाठी बेजललेस डिस्प्ले, आर्टीफीशिअल इंटेलिजन्स बटन, अंडरडिस्प्ले सेल्फी कॅमेरा अशी अन्य फीचर्स असून हा फोन ऑगस्टमध्ये लाँच केला जाईल असे समजते.

Leave a Comment