शिर्डी गुरुपौर्णिमा उत्सवात भाविकांनी दिले ६.६६ कोटींचे दान


गुरूपौर्णिमेनिम्मित नगर जिल्यातील साईबाबा यांच्या शिर्डी येथे साजऱ्या झालेल्या तीन दिवसांच्या उत्सवात भाविकांनी ६.६६ कोटी रुपयांचे दान बाबांच्या चरणी अर्पण केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. २६ ते २८ जुलाई दरम्यान हा उत्सव साजरा झाला त्यात देश विदेशातून सुमारे ३ लाख भाविक बाबांच्या दर्शनासाठी आले होते.

शिर्डी संस्थांचे सीईओ रुबल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबांच्या दानपत्रात ३.८३ कोटी रोख रक्कम जमा झाली तर दान कौंटर वर १.५७ कोटी, ऑनलाईन, डेबिट, क्रेडीट कार्ड, डिमांड ड्राफ्ट, याद्वारे १ कोटी जमा झाले आहेत. अमेरिका, ब्रिटन, मलेशिया, कॅनडा, न्युझीलंड, खाडी देश येथील भाविकांकडून ११.२५ लाख रु. विदेशी चलनात दिले गेले आहेत तर १३.५३ लाख रुपयांचे सोने, चांदी दान आले आहे. दर्शन पास, भोजन, प्रसाद विक्री यातून २.७ कोटींची कमाई झाली आहे.

संस्थानाच्या खात्यात सध्या ४२५ किलो सोने, ४८०० किलो चांदी असून राष्ट्रीयीकृत बँकातून २१८० कोटींच्या ठेवी आहेत असेही अग्रवाल यांनी सांगितले.

Leave a Comment