आरबीआयने रेपो दरात केली पाव टक्क्यांची वाढ


नवी दिल्ली: रेपो दरात भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने पाव टक्क्यांनी वाढ केली असल्यामुळे रेपो दर ६.५०% तर रिव्हर्स रेपो दर ६.२५ % टक्के झाला आहे. रेपो दरात आरबीआयने वाढ केल्याने कर्जाचा हप्ता वाढणार आहे.

मागील महिन्यात २०१८-१९ या वर्षाचे तीसरे पतधोरण आरबीआयने जाहीर केले, रेपो दरात तेव्हाही पाव टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर आजही रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केल्याने महागाईही वाढण्याची चिन्ह आहेत. पतधोरण जाहीर करत, गव्हर्नर उर्जित पटेल यांनी रेपो दरांची घोषणा केली. आरबीआयने मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे.

रिझर्व्ह बँकेकडून बँका कर्ज घेतात, त्यावर जो व्याजदर रिझर्व्ह बँक आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट जर कमी झाला, तर बँकांना रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावे लागते. तर त्याउलट रेपो रेट वाढला तर बँकांना आरबीआयला जास्त व्याज द्यावे लागते. त्यामुळे जर बँकांना फायदा झाला, तर बँका ग्राहकांनाही व्याजदर कपात करुन फायदा मिळवून देता. मात्र जर तोटा झाला तर तोही ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. म्हणजेच वाढलेल्या रेपो दराचा सर्वसामान्य कर्जदारालाच फटका आहे.

Leave a Comment