उडान योजनेखाली ७५ शहरात सुरु होतेय हेलिकॉप्टर सेवा


येत्या ४ ऑक्टोबरला देहरादून येथे पंतप्रधान मोदी याच्या हस्ते उडे देश का आम नागरिक म्हणजे उडान या महत्वाकांक्षी सेवेचा शुभारंभ केला जात असून या सेवेअंतर्गत ज्या शहरात विमान सेवा देणे शक्य नाही अशी ७५ शहरे हवाई सेवेने जोडली जाणार आहेत. मोदी या सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. या सेवेची सुरवात उत्तराखंड मधील शहरांपासून सुरु होणार आहे.

देशातील सर्वसामान्य जनतेलाही विमानसेवेचा फायदा मिळावा आणि संबंधित शहरात पर्यटन, व्यापार व्यवसाय वाढून रोजगार निर्मिती व्हावी आणि त्या भागाचा विकास असे फायदे यातून मिळणार आहेत. यासाठी विविध सेवा कंपन्यांनी बोली लावून कंत्राटे मिळविले आहेत. पवन हंस, हेरीटेज, स्कायटोन एअरवेज या कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

उत्तराखंड बरोबरच आसाम, हिमाचल, मणिपूर राज्यातील शहरे या सेवेने जोडली जाणार आहेत.

Leave a Comment