कावड यात्रेत आकर्षणाचे केंद्र बनले आहेत ‘गोल्डन बाबा’


हरिद्वार – उत्तर भारतातील अनेक शिवभक्त श्रावण महिना सुरू होताच केशरी कपड्यात पुरा महादेवाच्या यात्रेला जातात. गढमुक्तेश्वर येथून पवित्र गंगाजल घेऊन ते येतात आणि शंकराला अभिषेक घालतात. कावड यात्री म्हणून या यात्रेकरूंना ओळखले जाते. अनेक वेशभूषा केलेले लोकही या यात्रेदरम्यान पाहायला मिळतात. दरम्यान गोल्डन बाबा या यात्रेत आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

ते या यात्रेत तब्बल वीस किलो सोने परिधान करून सामील झाले आहेत. गोल्डन बाबा या नावाने हे बाबा प्रसिद्ध असून यात्रेत सामील होताच सर्व भाविकांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या होत्या. ते ही यात्रा मागील २५ वर्षापासून सतत करत आहेत. उत्तर भारतातील ही सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. गढमुक्तेश्वर ते पुरा महादेवाची ७७.८ किलोमिटरची यात्रा भाविक पायीच पूर्ण करतात.

त्यांच्या खांद्यावर कावड म्हणजे पवित्र गंगा जलाने भरलेले माठ या यात्रेत असतो. ते हापूड जिल्ह्याच्या गढमुक्तेश्वरवरून पवित्र गंगाजल घेतात. ते गंगाजल पायी यात्रा करून उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील पुरामहादेवपर्यंत येतात. येथे गंगाजलाने शंकरावर अभिषेक केला जातो.

Leave a Comment