तेलंगणातील बोनालू उत्सव


तेलंगणात दरवर्षी आषाढ महिन्यात महाकाली देवीचा बोनालू उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. देवीने सर्व इच्छा पूर्ण केल्या त्याबद्दल देवाचे आभार मानणे आणि रोगराई पासून देवीने संरक्षण करावे म्हणून प्रार्थना करणे हा उद्देश या उत्सवामागे आहे. बोनालू मधील बोनमचा अर्थ भोजन, खाणे, प्रसाद असा आहे. या उत्सवात नवीन भांड्यामध्ये तांदूळ, गुल आणि दुथ वापरून बनविलेला पदार्थ देवीला वाहिला जातो. त्याची सजावट कडूनिंब आणि हळद लावून केली जाते. कुंकू, साडी, बांगड्या वाहिले जाते आणि हा कलश डोक्यावर घेऊन महिला देवीच्या मंदिरात जाऊन तेथे नैवेद्य अर्पण करतात.


मिळालेल्या माहितीनुसार १८१३ सालापासून हा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी हैदराबाद निजामाचे होते आणि तेथे त्याचे सैन्य होते. त्यावेळी तेथे हैजा नावाची रोगाची साथ आली आणि त्यात हजारो लोक मरण पावले तेव्हा सैनिकांनी उज्जैनच्या महाकालीला हि साथ ओसरुडे, तुझी मूर्ती येथे स्थापन करू अशी प्रार्थना केली आणि साथ ओसरली तेव्हा महाकालीची मूर्ती स्थापन केली. दुसरी कथा अशीही सांगतात कि महाकाली या दिवसात माहेरी येते म्हणून तिची पूजा केली जाते.

या भागात महाकाली पेदम्मा, पोचम्मा, मैसम्मा, गंडीमैसाम्मा, एल्लम्मा, पोलेराम्मा, महाकालम्मा अश्या विविध नावानी ओळखली जाते. उत्सवात शोभायात्रा काढली जाते आणि त्याची सुरवात गोलकोंडा जगदंबिका मंदिरापासून होते. त्यानंतर विविध मंदिरात हा उत्सव होतो आणि शेवटी सांगता पुन्हा गोलकोंडा येथील मंदिरात केली जाते.

Leave a Comment