भारतात दाखल होणार हार्ले डेविडसनच्या नव्या चार स्वस्त बाईक्स!


नवी दिल्ली – हार्ले डेविडसन आणि रॉयल इन्फिल्डच्या बाईक्सना नेहमीच बाईक राईडरची पहिली पसंती असते. मुळच्या अमेरिकन मोटारसाईकल कंपनी असलेल्या हार्ले डेविडसनने रॉयल इन्फिल्डच्या ‘बुलेट’ या बाईकला भारतात टक्कर देण्यासाठी कमी किमंतीच्या चार नव्या बाईक्स लवकरच लॉन्च करणार आहे. एका इलेक्ट्रिकल बाईकचा देखील यामध्ये समावेश आहे.

२०१९मध्ये LIVEWIRE™ ही बाईक भारतीय बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. ही इलेक्ट्रिक बाईक असणार आहे. ५०० सीसी ते १२५० सीसी इंजिन क्षमता असणाऱ्या तीन बाईक्सचा हार्ले डेविडसनच्या नव्या बाईक्समध्ये समावेश असणार आहे. लवकरच बाईक राईडरसाठी हार्ले डेविडसन पॅन अमेरिका १२५० सीसी, फ्युचर स्ट्रीटफाईटर मॉडेल ९७५ सीसी आणि फ्युचर कस्टम मॉडेल या नव्या बाईक्स उपलब्ध होणार आहेत.

बाईक राईडरसमध्ये गेल्या काही दिवसांपासून रॉयल इन्फिलडच्या बाईक्सची क्रेझ वाढत आहे. या नव्या बाईक्स लॉन्च करताना हार्ले डेविडसन या कंपनीने किमंतीमध्ये हार्लेच्या इतर बाईक्सच्या तुलनेत तफावत असल्याचा दावा केला आहे. हार्ले डेविडसनचे येत्या काळात भारतात मार्केट वाढवण्यासाठी या नव्या बाईक्सची किमंत कमी असू शकते. कंपनीकडून याबाबतची माहिती मोअर रोडस टु हार्ले डेविडसन या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली.

Leave a Comment