एकुलत्या एक प्रवाशाची विमानात अशी बडदास्त


समजा विमानाचे प्रवासाचे तिकीट बुक झाले आहे मात्र उड्डाणाच्या वेळी विमानात फक्त एकच प्रवासी असेल तर विमान रद्द होते आणि दुसऱ्या विमानात या एकट्या प्रवाशाची सोय कशीबशी करून दिली जाते हा बहुतेक सर्व विमानप्रवाशांना येणारा अनुभव. साद जिलानी या प्रवाशाला मात्र याच्याबरोब्बर उलट अनुभव आला आणि यामुळे साद एकदम भारावून गेला.

झाले असे कि सादला ग्रीसमधल्या कोर्फू येथून इंग्लंड मध्ये बर्मिंघम येथे यावयाचे होते त्यासाठी त्याने विमानाचे तिकीट बुक केले होते. तो वेळेप्रमाणे विमानतळावर आला तेव्हा १६८ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या विमानात तो एकटाच प्रवासी होता. बाकी प्रवाशांनी काही कारणांनी त्याची तिकिटे रद्द केली होती. मात्र साद विमानात चढला मात्र तेथील क्रुमेंबर्सनी त्याचे जोरदार स्वागत केले. पायलटने त्याला कॉकपिट मध्ये नेऊन त्याच्यासोबत सेल्फी कथली, त्याच्यासाठी मस्त गाणी लावली गेली. एकंदरीत एखाद्या फाईवस्टार हॉटेल मध्ये उतरल्यासारखे त्याचे स्वागत केले गेले.


साद सांगतो, संपूर्ण प्रवासात मी एकटा प्रवासी होतो मात्र क्रु मेम्बर्सनी मला अजिबात बोअर होऊ दिले नाही. एखाद्या राजासारखा माझा हा प्रवास झाला. मी ४० युरोचे तिकीट काढले होते पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मी माझ्या नियोजित स्थळी उतरलो तेव्हा मला विमान कंपनीने ६० युरो गिफ्ट व्हाऊचरही दिले. याचा वापर मी पुढच्या प्रवासात करू शकणार आहे.

Leave a Comment