नव्या मानकांनुसार बनणार वजनाला हलकी हेल्मेट्स


ब्युरो ऑफ इंडिअन स्टँडर्ड म्हणजे बीआयएस ने भारतात हेल्मेटसाठी स्टँडर्ड नियम बदलले असून नव्या नियमानुसार यापुढे हेल्मेट उत्पादक कंपन्यांना उत्पादन करावे लागणार आहे. यासाठी गुणवत्ता नियम अधिक कडक केले गेले आहेत आणि १५ जानेवारी २०१९ पासून ते लागू होणार आहेत. या नव्या नियमामुळे रस्त्यावर विकल्या जाणारी लोकल हेल्मेटवर बंदी येणार असल्याचे समजते.

रस्ते वाहतूक मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार सध्या हेल्मेटचे वजन दीड किलो आहे ते १ किलो २०० ग्रामवर आणले गेले आहे. आयएसआय मार्क नसलेली हेल्मेट विकणे हा गुन्हा ठरविला गेला असून हा नियम मोडणाऱ्यांसाठी भक्कम दंडाची तरतूद केली गेली आहे. ग्राहकांना नव्या नियमानुसार बनलेली हेल्मेट वापरणे बंधनकारक केले गेले आहे. हेमेत्च्या विविध वातावरणात चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. हेल्मेट किती दाब पेलू शकतात, किती घर्षण सोसू शकतात याच्याही चाचण्या घेतल्या गेल्या आहेत आणि त्यानुसार नवे नियम आणि मानके ठरविली गेली आहेत.

देशात हेल्मेट वापरणे बंधनकारक असूनही आणेल दुचाकीस्वार ते वापरत नाहीत. पोलीस कारवाईला सामोरे जावे लागू नये म्हणून सुरक्षित नसलेली, स्वस्तातली, रस्त्याकडेला मिळणारी हेल्मेट जवळ बाळगतात, यामुळे रस्ते अपघात झाले तर याच वाहनचालकांना धोका अधिक असतो. नव्या नियमामुळे हा धोकाही कमी होणार आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment