श्रावणात भोलेनाथाचा मुक्काम असतो सासुरवाडीला


श्रावण महिना आता लवकरच सुरु होत आहे, उत्तर भारतात तो सुरु झालाही आहे. या काळात देवांचे देव महदेव म्हणजे भोलेनाथ यांची आराधना, पूजा करण्याची पद्धत आहे. देशभरातील हजारो शिवमंदिरात भाविकांची गर्दी उसळेल हे लक्षात घेऊन तशी तयार देवस्थाने करतही आहेत. पण पुराणातील कथानुसार श्रावण महिन्यात भोलेनाथ हरिद्वारच्या कनखल भागात असलेल्या त्यांच्या सासुरवाडीत मुक्कामास असतात. दक्ष महादेव मंदिर असे या ठिकाणाचे नाव आहे.

महादेवाचे सासरे दक्ष प्रजापती. त्यांची कन्या सती हिने वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन महादेवाशी विवाह केला त्याने दक्ष चिडले होते. त्यामुळे त्यांनी यज्ञ केला तेव्हा सती आणि महादेवाला बोलावले नव्हते. सती महादेवाने जाऊ नकोस असे सांगूनही माहेरी आली मात्र तिथे तिचा अपमान केला गेला तेव्हा चिडून तिने यज्ञात उडी घेऊन स्वतःला जाळून घेतले अशी कथा आहे. यामुळे संतापलेल्या महादेवाने दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला मात्र दक्षाने त्याची क्षमा मागितली होती म्हणून महादेवाने त्याला बकऱ्याचे तोंड लावून जिवंत केले. हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला तेथे मंदिर उभारले गेले.

या मंदिराचे नाव दक्ष महादेव असे असून ते महादेवाला समर्पित आहे. या मंदिरात ज्या यज्ञकुंडात सतीने उडी घेतली ते कुंड पाहायला मिळते त्याला सती कुंड असेच नाव आहे. गंगाकिनारी असलेल्या दक्ष घाटावर स्नान करून भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. श्रावणात येथे मोठी गर्दी असते.

Leave a Comment