अमूल वर्षअखेरी बाजारात आणणार उंटीणीचे दुध


दुध आणि दुग्धजन्य पदार्थ यासाठी देशभर प्रसिद्ध असेलेली अमूल या वर्षअखेरी उंटीणीचे दुध बाजारात आणत असून अर्धा लिटर पॅक मध्ये ते पुरविले जाणार आहे. उंटीणीचे दुथ आरोग्यदृष्ट्या अतिशय पौष्टिक आणि अनेक औषधी गुंधार्मानी परिपूर्ण असते असे अभ्यासात सिद्ध झाले आहे. या दुधाची प्रतीक्षा बाजारात दीर्घकाळ केली जात आहे. अमूलचे प्रमुख आर. एस सोढी या संदर्भात म्हणाले सर्वप्रथम अहमदाबाद मध्ये वर्षअखेरी या दुधाचा पुरवठा सुरु होईल आणि नंतर देशभरात ते उपलब्ध केले जाणार आहे.

उंटीणीच्या दुधापासून बनविलेले चॉकलेट अमूलने यापूर्वीचा बाजारात आणले असून त्याला फारच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दुध पुरवठ्यासाठी कच्छ जिल्हा दुग्ध उत्पादक संघ( सरहद डेअरी) त्यासाठी आवश्यक सुविधा म्हणजे संयंत्रे, मशीन्स ३ ते चार महिन्यात कार्यान्वित करत आहे. सरहद डेअरीचे अध्यक्ष वलमजी हुम्बल म्हणाले व्यावसायिक पातळीवर हे दुध उत्पादन केले जाणार आहे. चॉकलेटसाठी यापूर्वीच दररोज दीड लाख लिटर दुध आणंद येथे पाठविले जात आहे.
उंटीणीच्या दुध विक्रीमुळे उंटपालन करणाऱ्यांना चांगली कमाई होऊ शकणार आहे. सध्या या दुधाचा खरेदीदर २५ रु.लिटर वरून ५० रु. लिटरवर गेला आहे. अमूल पॅक मधून हे दुध पुरविणार आहे. त्याची मागणी वाढेल तसा या व्यवसायातून उंटपालन करणार्यांना मिळणारा मोबदला वाढू शकेल आणि मोठी बाजारपेठ त्यांना मिळेल असा विश्वास आहे.

Leave a Comment