असे आहे बॉलीवूडच्या ‘बाजीराव’चे लक्झरी कार कलेक्शन


आपल्या अल्लडपणा आणि अफलातून अदाकारीसाठी अभिनेता रणवीर सिंह चांगलाच लोकप्रिय आहेच, पण तो त्याची बिनधास्त अंदाजासाठी आणि ड्रेसिंग स्टाइलसाठीही ओळख आहे. त्याचे चाहतेही त्याची ही आगळीवेगळी स्टाइल फॉलो करतात. कपड्यांसोबत रणवीर सिंहला लक्झरी कार कलेक्शनचीही आवड असल्यामुळे त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सचे कलेक्शन आहे.

रणवीर ८६ लाख रुपये किंमत असलेली टोयोटा लॅंड क्रूजर ही कार फार चालवत नाही. पण त्याच्या कलेक्शनमध्ये ही कार आहे. त्याने ही कार आपल्या करिअरच्या सुरुवातीला खरेदी केली होती. ऑडी क्यू ५ या कारचाही रणवीरकडे असलेल्या एकापेक्षा एक आलिशान कार कलेक्शनमध्ये समावेश आहे. ५५ लाख रुपये या कारची किंमत आहे.

मारूतिची सीयाज ही कार रणवीर सिंगकडे सुद्धा आहे. या कारचा तो ब्रॅन्ड अॅम्बेसेडर होता. त्यामुळे ही कार त्याला गिफ्ट मिळाली होती. अनेक बॉलिवूड कलाकारांची रेंज रोव्हर वॉग ही शानदार आणि आलिशान कार आवडती कार आहे. ही कार रणवीरला सुद्धा पसंत असून या कारची किंमत १.६० कोटी रुपये आहे. तर एस्टन मार्टिन रॅपिड एस त्याच्या कलेक्शनमधील ही सर्वात फेवरेट कार आहे. रणवीरने ही 4 कोटी रुपयांची कार आपल्या वाढदिवसाला स्वत:ला गिफ्ट केली होती.

रणवीर दररोज कुठे येण्या-जाण्यासाठी मर्सिडीज इ क्सास या कारचा वापर करतो. ५५ लाख रुपये किंमतीची ही कार फार आरामदायक आहे. मर्सिडीज बेंज जीएल क्लास ही कारही रणवीरच्या आवडत्या कारपैकी एक आहे. या कारची किंमत ८० लाख रुपये आहे. रणवीर सिंह जगुआर एक्सजेएल ही कार अनेकदा वापरतो. तो ही कार कुठेही पार्टिला जाताना वापरतो. या कारची किंमत १ कोटी रुपये एवढी आहे.