मॅक्डोनल्डमध्ये काम करणाऱ्या तरुणाची इंग्लंडमध्ये आहे कोट्यवधींची कंपनी


इंग्लंड : केवळ स्वप्न पाहून आपली स्वप्नपूर्ण होत नाहीत. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि चिकाटी असावी लागते. आणि मेहनतीने मिळालेल्या फळाची चव काही औरच असते. असेच काहीसे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. केवळ काही रुपये घेऊन लंडनमध्ये गेलेल्या भारतीय तरुणाची आज तिथे १८ कोटी रुपयांची कंपनी आहे. त्याचा कंपनी उभारण्यामागचा संघर्ष देखील थक्क करणारा आहे. चला जाणून घेऊ या त्याच्या संघर्षाची कहाणी…

तो इंग्लंड काहीतरी करण्याच्या नादात गेला आणि आज कोट्यवधींच्या कंपनीचा मालक झाला आहे. इंग्लंडला तो ज्यावेळी गेला त्यावेळी मॅक्डोनल्डमध्ये तो काम करायचा. त्याला त्यासाठी दिवसाकाठी ३५० रुपये रोजंदारी मिळायची. आज त्याच तरुणाचे प्रॉडक्ट्स इंग्लंडच्या प्रसिद्ध हार्वे निकोलस स्टोरमध्ये विकले जातात.

रुपेश थॉमस असे या भारतीय तरुणाचे नाव असून केरळमध्ये जन्मलेला रुपेश इंग्लंडच्या विम्बल्डनमध्ये आज ९ कोटींच्या बंगल्यात राहतो. तर साऊथ इंग्लंडच्या क्रेडॉनमध्ये त्याने त्यांचा दुसरा बंगला ३ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. त्याचा टुक टुक चहाच्या बिझनेसची किंमत आज १८ कोटी रुपयांची आहे. आता लक्झरी डिपार्टमेंटल स्टोर हार्वे निकोलसमधून त्याच्या चहाची विक्री होते. इंग्लंडसोबत केरळमध्ये जन्मलेल्या रुपेशचा एक वेगळाच संबंध होता. त्याने सांगितले की, कामानिमित्त त्याचे वडील वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायचे. इंग्लंडचा त्यांच्याकडे एक फोटो होता. मी नेहमी तो बघायचो आणि मी नेहमी त्या ठिकाणी जाण्याचे स्वप्न पाहत होतो.

रुपेशने २३ वर्षांचा असताना २८ हजार रुपयात आपली बाईक विकली आणि काही रक्कम वडिलांकडून घेतली. त्यानंतर तो २००२ साली इंग्लंडला गेला. तो त्यावेळी इस्ट इंग्लंडच्या स्ट्रेटफोर्डमध्ये पोहोचला. त्याने येथे मॅक्डोनल्डमध्ये काम केले. त्याला येथे ३२० रुपये मिळायचे. त्याने सांगितले की, हे काम फार मेहनतीचे होते. पण नेहमी मी हसत हसत काम केले. मला अनेक बिझनेसमनला पाहून जाणवत होते की, मला काय करायचे आहे. या कामानंतर काही दिवसातच मला सेल्समनचे काम मिळाले. माझे चांगले काम पाहून मला कंपनीने वेस्ट सेलर केले आणि त्यानंतर तो टीम लिडर झाला. या कामावेळीच त्याची भेट पत्नी अलेक्झांड्रासोबत झाली.

दोघांनी अनेक भेटींनंतर २००७ मध्ये लग्न केले. फ्रान्स आणि भारतातील केरळ या दोन्ही ठिकाणी लग्नाचे सेलिब्रेशन झाले. २००९मध्ये विम्बल्डन टेनिस ग्राऊंडजवळ त्यांनी एक मिड टेरेस घर घेतले. त्यांना एक मुलगा असून तो ७ वर्षांचा आहे. रुपेशने सांगितले की, सेल्समन म्हणून काम करणे फार कठिण होते. तासन् तास काम करावे लागत होते. पण पैशांची मला फार गरज होती. त्यामुळे काम करणेही गरजेचे होते. त्याच्या सेल्सच्या कौशल्यामुळे त्याला एका मोबाइल कंपनीमध्ये नोकरी मिळाली. रुपेशने सांगितले की, २००७मध्ये त्याला बिझनेसची आयडिया आली. पत्नीची भारतीय चहाची आवड त्याने पाहिली होती.

चहा अलेक्झांड्राला फार आवडत होता. दोघे जेव्हाही भारतात असायचे तेव्हा ती साधारण दिवसभरात १० कप चहा प्यायची. यूकेमध्येही हे सुरुच होते. पण चहामध्ये साखर जास्त होती. त्यासोबतच चहाच्या पानांपासूनही हा चहा तयार होत नव्हता. त्यामुळे त्याला याच्या प्रॉडक्शनची कल्पना सुचली. २०१५ मध्ये त्याने त्याच्याकडे जमा असलेल्या पैशांपैकी दीड लाख रुपये बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याला याचा फायदाही झाला. रुपेशने सांगितले की, हा एकप्रकारे जुगारच त्याने खेळला होता. त्याला वाटले होते की, येथे चहासाठी मोठे मार्केट आहे आणि हा जुगार यशस्वी ठरला.