सर्वाधिक पाऊस पडणारे, सुंदर चेरापुंजी


मेघालयातील चेरापुंजी हे ठिकाण देशातील सर्वाधिक पाउस पडणारे म्हणून प्रसिद्ध असले तरी येथेही नोव्हेंबर मध्ये पाण्याची चणचण निर्माण होते असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र खासी पर्वत रांगात वसलेले हे सुंदर स्थळ सोहरा किंवा चुर्रा नावानेही ओळखले जाते. या शब्दाचा अर्थ आहे संत्र्याची भूमी. या ठिकाणी जाण्यासाठी मार्च ते मे आणि जून ते सप्टेंबर हा उत्तम काळ मानला जातो.


या भागात मुख्यत्वे खासी आणि जानियास आदिवासी लोकांची वस्ठी आहे. येथील लाईव्ह ब्रिज स्थानिक बायो इंजिनिअरींगचा उत्तम नमुना मानले जातात. येथे रबराची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याची मुळे लांबवर पसरतात. त्यामुळे नदीकाठी असलेल्या झाडांची मुळे एकत्र करून हे लोक पूल तयार करतात. ही मुळे वाढत राहतात आणि त्यामुळे पूल अधिक मजबूत होतात. असे दोन मजली पूल येथे पाहायला मिळतात.


हिरवळ, सुंदर झरे आणि विविध आकाराचे धबधबे हे येथील आणखी एक आकर्षण. नोहकलीकाई, सेवन सिस्टर, कावा, वाकवा हे त्यातील काही प्रमुख धबधबे. मावासमइ आखाह गुहा गुहा रोमांच्याची आवड असणारया पर्यटकांना नक्कीच आवडतील. येथे ढग हे पवित्र मानले जातात आणि त्यामुळे या ढगांसाठी लोकगीते, नृत्ये केली जातात. पर्यटक या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. येथील इको पार्क मध्ये सुंदर आणि अनेक प्रकारची आर्किड फुले पाहता येतात. फोटोग्राफिची आवड असणार्यांना येथे फोटो काढण्यासाठी अनेक सुन्दर नजारे आहेत.

येथील पोर्क आणि राईस डिशेश अतिशय चविष्ट असतात त्याचबरोबर खास तांदूळ आणि विविध भाज्या वापरून केलेला सोहरा पुलाव जीभ खवळवतो. या पुलाव मध्ये मसाले घातले जात नाहीत हे त्याचे वैशिष्ट आहे.

Leave a Comment