मादाम तुसाद्समध्ये याही बॉलीवूड स्टार्सचे मेणाचे पुतळे


अभिनेत्री दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, करण जोहर या बॉलीवूड स्टार्सचे मेणाचे पुतळे जगप्रसिद्ध मादाम तुसाद्स संग्रहालयामध्ये पहावयास मिळणार असून, हे पुतळे तयार करण्यासाठी तेथील शिल्पकारांनी नुकतीच या स्टार्सची भेट घेऊन पुतळे तयार करण्याच्या दृष्टीने सर्व मापे घेतली. त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांचा रंग, केसांचा रंग, इत्यादी तपशीलही शिल्पकारांनी जाणून घेतले. या बॉलीवूड स्टार्सचे मेणाचे पुतळे जगातील नामवंत वॅक्स म्युझियम मध्ये ठेवले जाणार असल्याने या कलाकारांचे दर्शन सध्याच्या पिढीला आणि यांनतरही येणाऱ्या अनेक पिढ्यांना होणार आहे.

या पूर्वीही अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीजचे पुतळे लंडन येथील मादाम तुसाद्स मध्ये प्रदर्शित केले गेले आहेत. या सेलिब्रिटीजमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय या कलाकारांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचे पुतळे सिंगापूर येथील मादाम तुसाद्स संग्रहालयामध्येही आहेत. अभिनेत्री काजोल आणि बॉलीवूडचे ‘लखन’ असलेल्या अनिल कपूर यांचेही मेणाचे पुतळे सिंगापूर येथील मादाम तुसाद्स म्युझियममध्ये आहेत.

मादाम तुसाद्स वॅक्स म्युझियम भारताची राजधानी दिल्ली येथेही असून, येथे ‘संजू’ फेम रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे मेणाचे पुतळे आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या वरुण धवनचा मेणाचा पुतळा हॉंगकॉंग येथील मादाम तुसाद्स येथे आहे. तसेच याच संग्रहालयामध्ये अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोन, करण जोहर, दिलजित दोसंझ, आणि शाहिद कपूर यांचेही पुतळे लवकरच पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री कतरिना कैफ हिचा मेणाचा पुतळा लंडन येथील मादाम तुसाद्समध्ये पहावयास मिळतो.

अभिनेता शाहरुख खान याचे पुतळा केवळ लंडन मधील मादाम तुसाद्समधेच नाही, तर बर्लिन, सिडनी, सिंगापूर आणि दिल्ली येथील संग्रहालयांमध्ये ही आहे. अमिताभ बच्चन यांचा पुतळा लंडनमधील संग्रहालयामध्ये २००९ सालापर्यंत होता. यानंतर हा पुतळा न्यूयॉर्क, हॉंगकॉंग, बँकॉक आणि वॉशिंग्टन डीसी येथेही काही दिवस ठेवला गेला होता. ऐश्वर्याचा एक पुतळा लंडन येथील संग्रहालयामध्ये असून, दुसरा पुतळा न्यूयॉर्क येथील संग्रहालयामध्ये आहे. तसेह दबंग खान सलमान याचे ही पुतळे लंडन आणि न्यूयॉर्कमधील संग्रहालायांमध्ये आहेत. अभिनेत्री करीना कपूर खान हिचे मेणाचे पुतळे लंडन आणि सिंगापूर येथील संग्रहालायांमध्ये आहेत.

Leave a Comment