अवघ्या तीन मिनिटात विकली गेली रॉयल एन्फिल्डची २५० युनिट


देशातील सर्वात जुनी मोटारसायकल उत्पादक कंपनी रॉयल एन्फिल्डच्या लिमिटेड एडिशन क्लासिक ५०० पेगासासची २५० युनिट अवघ्या तीन मिनिटात विकली गेली. जगभरात या मोडेलची १ हजार युनिट विकली जाणार असून त्यातील २५० भारतात विकली जाणार होती. मात्र हे मॉडेल लाँच होताच २५ जुलाईला सर्व २५० गाड्या १७८ सेकंदात विकल्या गेल्या.

मिळालेल्या माहितीनुसार हा सेल पृवी १० जुलाईला होणार होता मात्र या गाडीला इतकी प्रचंड मागणी आली कि कंपनीची वेबसाईट क्रॅश झाली त्यामुळे हि विक्री २५ जुलाईला केली गेली. प्रथम या प्रथम घ्या या पद्धतीने हि विक्री केली गेली. आरइ / डब्ल्यूबी १२५ टू स्ट्रोक बाईकवरून या बाईकचे डिझाईन केले गेले होते. ब्रिटीश पॅराट्रूपरनी दुसऱ्या महायुद्धात या गाडीचा वापर केला होता. या बाईकला फ्लायिंग फ्ली असेही नाव आहे.

ज्या लकी ग्राहकांना हि बाईक मिळाली त्यांना मिलिटरी इन्स्पायर्ड कॅनक्स पेनीअर्स, पेगासास लोगो, पेगासास अक्षरे लिहिलेले हेल्मेट, टी शर्ट दिले गेले. सर्व्हिस ब्राऊन आणि ओलिव्ह ग्रीन अश्या दोन रंगात हे मॉडेल होते मात्र भारतात फक्त ब्राऊन रंगाची युनिट विकली गेली. ४९९ सीसीच्या या बाईक एअर कुल्ड सिंगल सिलिंडर इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससह दिले गेले आहे. मुंबई मध्ये या बाईकची किंमत एकस शो रूम २ लाख ४९ हजार रु. होती.

Leave a Comment