कृष्णाचे गुरुकुल, उज्जैनचा सांदिपनी आश्रम


आज गुरुपौर्णिमा. भारतीय शास्त्रात गुरुपौर्णिमेचे आगळे महत्व आहे. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी आपल्या गुरुना आदरांजली देण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात गुरु हा देवापेक्षा मोठा मानला जातो कारण देव म्हणजे काय याची ओळख करून देणारा गुरूच असतो. उत्तम शासक, राजकारणी, योद्धा, सखा, गुरु, व्यवस्थापन कुशल, गोपगोपींचा मित्र अश्या अनेक रुपात वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण देशात पुजला जातो. त्याचे गुरु होते सांदिपनी. कृष्णाची हि शाळा म्हणजे गुरुकुल होते उज्जैन येथे. तेथे आजही सांदिपनी आश्रम आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्याचा परिचय आमच्या वाचकांसाठी


श्रीकृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम या आश्रमात ५२२९ वर्षांपूर्वी मथुरेतून शिक्षणासाठी आले होते. येथे कृष्णाने ६४ कला १६ विद्यांचे ज्ञान ६४ दिवसात मिळविले असे मानले जाते. त्यात शस्त्र, शास्त्र, धर्म याबरोबरच सुतार काम, अत्तर बनविणे याचाही समावेश होता. या आश्रमात कृष्ण जे जे शिकला त्याचे प्रदर्शन चित्ररुपात मांडले गेले आहे. तसेच आश्रमात कृष्ण, बलराम आणि सुदामा यांच्या मूर्ती आहेत.

गुरु सांदिपनी रोज स्नानासाठी उज्जैन हून त्यावेळेचे लखनौ येथे गोमती नदीवर जात असत. तेव्हा कृष्णाने योग शक्तीच्या सहाय्याने बाण मारून कुंड निर्माण केले आणि त्यात गोमती नदी आली अशी कथा आहे. हे पवित्र कुंड आजही आश्रमात असून भाविक येथे स्नान करतात.

कृष्णभक्त या आश्रमाला मोठ्या संखेने भेट देतात. येथे कृष्ण, बलराम आणि सुदामा यांच्या अनेक कथा सांगितल्या जातात.
Lord Shrikrishna’s gurukul – Sandipani ashram in Ujjain

Leave a Comment