अवघ्या २ तासांच्या कालावधीत फेसबुकला १७ अब्ज डॉलरलचा फटका


नवी दिल्ली – अवघ्या २ तासांच्या कालावधीत फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गला १७ अब्ज डॉलरलचा फटका बसला असून सोशल मीडियाचे शेअर्स न्यूयॉर्क शेअर बाजारामध्ये २० टक्क्यांनी घसरले आहेत. या घसरणीमध्ये बसलेल्या फटक्यामुळे श्रीमंताच्या यादीमध्ये झुकेरबर्गची ६ व्या स्थानावर घसरण झाली आहे.

नुकताच आपला आर्थिक अहवाल फेसबुकने प्रसिद्ध केला असून कंपनीच्या दुसऱया तिमाही अहवालात फेसबुकसाठी निराशाजनक असल्याचे त्यामध्ये सांगण्यात आले आहे. त्यांच्या गुतवणूकदारांमध्ये त्यामुळे चिंता वाढली आणि शेअरबाजारात फेसबुकचे शेअरमध्ये घसरण सुरू झाली.

तिसऱ्या आणि ४ तिमाही अहवालामध्ये कंपनीचा नफा घटण्याची शक्यता फेसबुकचे वित्त अधिकारी डेविड वेनर यांनी वर्तवली असून त्यानंतर फेसबुकच्या शेअर्समध्ये २४ टक्क्यांची घसरण झाली. झुकेरबर्गला या घसरणीनंतर २ तासात १७ अब्ज डॉलरचा फटका बसला. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सच्यामते श्रीमंताच्या यादीत झुकेरबर्ग आता सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे.

Leave a Comment