मंगळावर सापडले पाण्याचे तळे


नवी दिल्ली – अमेरिका जर्नल सायन्स या नियतकालिकात मंगळ ग्रहावरील बर्फाच्या थराखाली हे २० कि.मी. व्यासाचे भूमिगत पाण्याचे सरोवर सापडले असल्यामुळे तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यताही निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना ऑस्ट्रेलियातील स्विनबर्न विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक अ‍ॅलन डफी म्हणाले, हे संशोधन फारच आश्चर्यकारक असून मंगळावर पाणी असल्याचे हे संशोधन इतर सर्व संशोधनापेक्षा वेगळे आहे. मंगळावर सापडलेला पाण्याचा हा सर्वात मोठा प्रदेश असून, मंगळावर पाणी केवळ ठिबकत नाही. तर, ते मोठ्या प्रमाणात असावे, असे ते पुढे म्हणाले.

सध्या मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळवण्याची प्रतीक्षा वैज्ञानिक करत आहेत. मंगळावर जे सरोवर सापडले आहे, त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. बर्फाच्या दीड किलोमीटर खाली ते सरोवर असून त्यात सूक्ष्मजीव असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मंगळावर सूक्ष्मजीव सापडण्याची शक्यता या शोधामुळे वाढली असल्याचे ऑस्ट्रेलियन खगोलीय वेधशाळेचे फ्रेड वॉटसन यांनी सांगितले. या सरोवरचा शोध युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारच्या मदतीने लागला आहे.

Leave a Comment