ट्विटरने केला विकासकांसाठी नवीन नियमावलीचा अवलंब


सॅन फ्रान्सिस्को- ट्विटरने एप्रिल आणि जूनदरम्यान १ लाख ४३ हजारहून अधिक अॅप्लिकेशन्स काढून टाकले असून ट्विटरच्या धोरणांचे जे उल्लंघन करीत होते. त्याचबरोबर ट्विटरने अशी देखील घोषणा केली आहे की, कंपनीकडून धोकादायक अॅप्स ताबडतोब थांबविण्यासाठी सुधारित तंत्राचा आणि प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी गुंतवणूक केली आहे.

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने क्लिन-अप प्रक्रियेचा एक भाग म्हणून सर्व विकासकांसाठी ट्विटर ऑफ ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसच्या (एपीआय) प्रवेशाची विनंती केली आहे. योएल रोथ आणि रॉब जॉन्सन यांनी मंगळवारी रात्री उशीरा आपल्या ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमणे, विकासक या बदलामुळे आमच्या यंत्रणेचा वापर करतील. कंपनीच्या सेवेचा वापर करणाऱ्या लोकांकडून सार्वजनिक डेटा कसे वापरतात त्यामध्ये अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण ठेवता येईल.

रिपोर्टनुसार, मे आणि जूनमध्ये ट्विटरने आपल्या साईटवरील बॉट्स आणि ट्रोल्स काढण्यासाठी एका मोहिमेदरम्यान ७ कोटींपेक्षा जास्त बनावट अकाउंट्स डिलीट केली आहेत. नव्या डेव्हलपर अकाउंटसाठी कंपनीने अर्ज प्रक्रिया देखील जाहीर केली आहे. ज्यामध्ये कंपनीकडून अॅप संदर्भात केलेल्या सुचनांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर सतत खोटी माहिती देणारे कमी दर्जाच्या अॅपची नोंदणी थांबवण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. याबाबत ट्विटरकडून आलेल्या अधिकृत माहितीनूसार या प्रक्रियेतून ट्विटरच्या मानक आणि प्रीमियम एपीआय प्रवेशासाठी सर्व नवीन विनंत्या जाणे आवश्यक आहेत.

Leave a Comment