बिग डील; १३६ अब्ज रूपयांमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी जोडप्याने विकली आयटी कंपनी


नवी दिल्ली – सिंटेल आयटी कंपनीचे मालक मूळचे भारतीय असलेल्या भारत देसाई आणि त्यांची पत्नी निरजा सेठी यांनी आपली कंपनी फ्रेंचच्या एटोस कंपनीला ३.४ अब्ज डॉलर म्हणजेच २३१.२ अब्ज रुपयांना विकली आहे. या दाम्पत्यांचा कंपनीत ५७ टक्के हिस्सा असल्याने कंपनीच्या पैशातून त्यांना आता १३६ अब्ज रूपये मिळणार आहेत.

केनियात देसाई यांचा जन्म झाला पण त्यांचे बालपण भारतात गेले. आयआयटी बॉम्बेमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिंनीयरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना टीसीएसमध्ये प्रोग्रामरची नोकरी मिळाल्यानंतर ते १९७६ साली अमेरिकेला रवाना झाले. येथे नोकरी केल्यानंतर यूनिवर्सिटी ऑफ मिचीगान येथून त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले. त्यांची तेथे सेठी यांच्याशी ओळख झाली. शिकत असतानाच या दोघांनी मिळून एक आयटी कंपनी सुरू केली. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये सिंटेलची स्थापना केली. त्यांचे टीसीएस सारखी कंपनी उभारण्याचे स्वप्न होते.

त्यांच्या कंपनीला सुरूवातीच्या काळात काही खास फायदा झाला नाही. पण कालांतराने कंपनीचा नफा चांगलाच वाढत गेला. या कंपनीची वाढ इतर आयटी कंपन्यांच्याप्रमाणे वेगाने होऊ शकली नाही. सिंटेलच्या एक वर्षांनंतर इन्फोसिसची स्थापना झाली पण सिंटेलपेक्षा त्यांचा फायदा १० पटीने अधिक होता. सिंटेलच्या कामगिरीत चढ-उतार झाले, कंपनीने गेल्या वर्षी चांगला फायदा मिळवला होता. आता या जोडप्याला ही कंपनी विकून १३६ अब्ज रूपये मिळणार आहेत.

Leave a Comment