सोनीने तयार केला ४८ एमपीचा इमेज सेन्सर


आजकाल स्मार्टफोनचा वापर कॅमेऱ्यासारखा केला जातो आहे त्यामुळे फोन घेताना त्यामध्ये फोटोसाठी काय ऑप्शन आहेत याचा आवर्जून उल्लेख केला जातो. विवो कंपनीने ४० एमपीचा इमेज सेन्सर त्यांच्या फोन मध्ये देऊन सर्वाधिक क्षमतेचा कॅमेरा देण्याचा विक्रम केला आहे. मात्र सोनी कंपनीने त्यापुढचे पाउल टाकत ४८ एमपीचा इमेज सेन्सर तयार केला असल्यचे द वर्जच्या अहवालात नमूद केले गेले आहे.

आयएमएक्स ५८६ या नावाचा हा सेन्सर उत्तम प्रतीचे फोटो काढू शकणारा पॉवरफुल आणि जादा क्षमतेचा सेन्सर आहे. यामध्ये क्वाद बेअरकलर फिल्टर तंत्रज्ञान वापरले गेले आहे. याचा वापर सुलभ आणि सोपा असून अगदी कमी प्रकाशात चांगले फोटो निघू शकतात. या पूर्वीच्या तंत्रज्ञानात फोटोची क्वालिटी वाढली कि मेमरी साईज वाढत असे, नव्या तंत्रामुळे मेमरी साईज वाढत नाही.सोनी सप्टेंबर पासून या सेन्सरचा पुरवठा सुरु करणार आहे आणि त्याची किंमत आहे २७ डॉलर्स. त्यामुळे त्यानंतर ४८ एमपी कॅमेरा सेन्सर असलेले स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध होऊ शकणार आहेत.

Leave a Comment