एव्हरेस्ट जिंकण्याची चढाओढ हिमालयाच्या मुळावर


मे आणि सप्टेंबर ऑक्टोबर हा काळ एव्हरेस्ट चढाईचा काळ मानला जातो. हिमालयातील तसेच जगातील सर्वाधिक उंचीचे हे शिखर सर करणे खरोखर धाडसाचे आणि कष्टप्रद आहेच. मात्र गेली काही वर्षी ज्या संखेने गिर्यारोहक या शिखरावर चढाई करत आहेत त्यामुळे हिमालयाचा श्वास कोंडायची वेळ आली असल्याचे मत पर्यावरण तज्ञ व्यक्त करत आहेत. यंदाच्या वर्षात आत्तापर्यंत ७०० गिर्यारोहकांनी हे शिखर काबीज केले आहे. दररोज किमान २३ गिर्यारोहक चढाईसाठी जात होते १ महिन्यात ७०० जणांनी त्याची मोहीम फत्ते केली आहे. मात्र या गर्दीच्या विपरीत परिणाम हिमालयातील हवामान आणि पर्यावरण यावर होत असल्याचेही दिसून आले आहे.

एव्हरेस्टवर जाणारे गिर्यारोहक ऑक्सिजन सिलिंडर, मोडलेली उपकरणे, शिल्लक अन्न आणि अन्य निरुपयोगी झालेल्या वस्तू तसेच मानवी विष्ठा तेथेच टाकून येतात. त्यामुळे तेथे कचर्याचे ढीग लागले आहेत. तसेच अनेकदा येथे वर चढणारे आणि उतरणारे याची एकाद्या वेळी इतकी गर्दी होते कि वाहतूक कोंडीचा अनुभव येथे घेता येतो. नेपाळ सरकारने एव्हरेस्ट वरील कचरा वाढू लागल्यानंतर काही नियम केले आहेत मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून आलेला नाही.

१९५३ मध्ये सर्वप्रथम एडमंड हिलरी आणि शेरपा तेनसिंग यांनी या शिखरावर पाय रोवले त्यानंतर आत्तापर्यंत हजारो जणांनी हे शिखर काबीज केले आहे. नेपाल सरकारला त्यातून मोठे उत्पन्न मिळते आणि हे उत्पन्न त्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देते हे खरे असले तरी त्यामुळे हिमालयाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याने गिर्यारोहकांच्या संख्येवर नियंत्रण आणले पाहिजे असा आग्रह धरला जात आहे.

Leave a Comment