लक्ष्मीचे आठ अवतार दर्शविणारे अष्टलक्ष्मी मंदिर


चेन्नई मध्ये समुद्र किनाऱ्यावर बांधले गेलेले अष्टलक्ष्मी मंदिर लक्ष्मीच्या आठ अवतारांचे दर्शन घडवितेच पण येथे विष्णूच्या दहा अवतरांचेही दर्शन घेता येते. कांची कामकोटीचे शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती स्वामी यांच्या इच्छेनुसार या मंदिराचे शुद्धीकरण १९७६ साली केले गेले आहे. या मंदिराची रचना ओम या अक्षराच्या आकारात केली गेली आहे. कारण ओम हा पहिला वैदिक मंत्र असून त्याला प्रणव असे म्हटले जाते.

हे मंदिर समुद्राकाठी आहे. समुद्राच्या लाटा सतत किनाऱ्यावर येत असतात आणि त्यातूनही ओंकार ध्वनी निनादात असतो. याच ओंकारात देव देवतांचे वास्तव्य असते असे मानले जाते.


मंदिराची रचना अष्टांग विमान स्टाईलची आहे. मंदिरे बांधायची हि प्राचीन शैली आहे. मंद्रीर तीन माजली असून तळमजल्यावर उभ्या स्वरूपातील विष्णू मूर्ती आणि लक्ष्मी आहेत, दुसऱ्या स्तरात बसलेल्या स्थितीतील मूर्ती तर तिसऱ्या स्तरात निद्रावस्थेतील विष्णुमूर्ती पाहायला मिळते. लक्ष्मीच्या विविध रूपातील मूर्ती येथे असून धन, सफलता, धान्य, समृद्धी, साहस, ज्ञान, अन्नदाता अशी लक्ष्मीची रूपे आहेत. देवीच्या या रूपांची स्थापना अष्टाकार असून त्या चार दिशांना आहेत.

Leave a Comment